कोलाड प्रतिनिधी (श्याम लोखंडे)
शेतकऱ्यांना बांधावर जाऊन दिली तहसीलदाराने पीक पाहणी कशी करायची माहिती
शासनाने सर्व शेतकऱ्यांना आव्हान केले आहे की, खरीप हंगामातील ई-पीक पाहणी ही आवश्यक आहे... ती जर नसेल तर आपल्या ७/१२ वर पीक लावण्यात येणार नाही...आणि याचा फटका शेतकऱ्यांना पिक विमामध्ये बसेल...जर आपण ई-पीक पाहणी केली नाही तर पिक विमा ही मिळणार नसल्याचे सांगत या योजनेची ई-पीक पाहणी कशी करायची याची माहिती रोहा अपर तहसीलदार प्रकाश म्हात्रे यांनी शेतकऱ्यांना बांधावर जाऊन दिली...रोहा तालुक्यातील बहुसंख्ये शेतकरी आजही ई पीक ॲप पासून वंचीच असल्याचे दिसून येत आहे...त्यामुळे शासन महसूल विभागाच्या वतीने येथील शेतकरी वर्गात याबद्दल अधिक जनजागृती म्हणून तलाठी सजा चिल्हे हद्दीतील शेतकऱ्यांना गठित करून याची शेताच्या बांधावर जाऊन प्रात्यक्षिक करून माहिती देण्यात आली...
ग्रुप ग्रामपंचायत तळवली तर्फे अष्टमी ग्राम पंचायत सभागृहात आयोजन शेतकरी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते...
सदरच्या योजनेची अधिक माहिती ग्रुप ग्रामपंचायत तळवली तर्फे अष्टमी ग्राम पंचायत सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दिली...यावेळी अपर तहसीलदार प्रकाश म्हात्रे, निवासी तहसीदार राजेश थोरे, कोलाड विभागीय मंडळ महेश पाटील, तलाठी सजा चिल्हेचे तलाठी मंगेश साळवी,ग्राम सेविका पिंपलकर,कोतवाल सौ खामकर,ग्राम पंचायतीचे सरपंच रविंद्र मरवडे, उपसरपंच संदीप महाडीक,सदस्य दयाराम मरवडे, हरिश्चंद्र मांगुळकर,सौ नीलम वाळंज,माजी सरपंच धनाजी लोखंडे, चिल्हे गाव कमिटी अध्यक्ष तुकाराम कोंडे, पोलिस पाटील गणेश महाडिक, अनंत लोखंडे,खेळू मरवडे, नामदेव मरवडे, नाकते,भास्कर कोल्हटकर,सौ गुलाब वाघमारे,सह शेतकरी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते...
खरीप हंगामातील पिक विमा हा १ रुपयामध्ये काढून मिळणार
तसेच सर्व शेतकरी बांधवांनी ई-पीक पाहणी केली नाही तर पीक विमा मिळणार नाही...आत्ताच करा नोंदणी तसेच यावर्षी शासनाने सांगितल्याप्रमाणे खरीप हंगामातील पिक विमा हा १ रुपयामध्ये काढून मिळणार आहे...परंतु हा खरीप हंगामातील पिक विमा मिळवण्यासाठी आपल्याला अजून एक काम करायचे आहे ते म्हणजे ई-पीक पाहणी ॲप हा मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे...तसेच त्यात आपल्या सर्वे नंबर सह गटाची माहिती वेळोवळी भरणे गरजेचे आहे... त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी वर्गाला ही त्याचा लाभ मिळणार आहे...त्यामुळे आता थेट तुमच्या पिकाची माहिती तुमच्या कडूनच शासनाला मिळणार आहे.
ई-पीक पाहणी कशी करायची ?
ई-पीक ॲपमध्ये सर्वात प्रथम आपल्या मोबाईलची लोकेशन ऑन करावे...महसूल विभाग निवडावा...नवीन असाल तर खातेदार नोंदणी करून पुढे जावे...पिक माहिती नोंदवा या ऑप्शन वर क्लिक करून शेताच्या मध्यावर उभा राहून पिकाचा क्लिअर फोटो काढून अपलोड करणे...म्हणजे ७/१२ वर आपल्या पिकाची नोंद घेतली जाईल...तसेच ज्या शेतकरी बांधवांकडे मोबाईल नसेल अशा शेतकऱ्यांनी आपल्या नातेवाईक किंवा आपल्या शेजारील शेतकरी यांच्या मोबाईल वर डाऊनलोड केलेत तरी तुमची माहिती मिळणार आहे...तसेच जवळपास एका ॲपवर शंभर सातबाराची नोंद करण्यात येणार असल्याचेही शेवटी म्हात्रे यांनी शेतकऱ्यांना सांगीतले...

