रोहा धाटाव प्रतीनिधी महेश वाडकर
मागील आठवड्यापासून रोहमध्ये एकाच महिन्यामध्ये तीन गुन्हे
शनिवार दिनांक २६:सध्याच्या घडामोडी बघता रोहा तालुक्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण बरेच प्रमाणात वाढत चाललेले पाहयाला मिळत आहेत..मागील आठवड्यापासून एकाच महिन्यामध्ये तीन गुन्हे झालेले आपणास पाहायला मिळाले...काही दिवसापूर्वी धामणसई येथे जादूटोणा यासारख्या अंधश्रधेचा प्रकार पहायला मिळाला... जादूटोणा करून पैशाचा पाऊस पाडणारे भोंदूबुवा यांच्या सर्व गोष्टीची माहिती स्थानिकाना मिळताच हा सर्व प्रकार येथील गावकऱ्यांनी उघड करून उद्धवस्त लावला व याची सर्व माहिती पोलीस प्रशासनाला दिली...
रोहा तालुक्यातील नागरीकांच्या मनात भीतीचे सावट
हा सर्व प्रकार संपत नाही तोच रोहा शहरामध्ये असलेल्या मध्यवर्ती ठिकाण दमखाडी येथे श्री राम लॉज येथे वेश्याव्यवसायाचा परदा फाश केला..जो की हा व्यवसाय पोलीस प्रशासनाला त्याचा शोध लागत नव्हता...आणि आता स्थानिक पोलिसाच्या सहकार्याने तो बंद करण्यात आला आहे...काही दिवसापूर्वी कोलाड येथे तिसे गावा ठिकाणी गेट मेन म्हणून कार्यरत असलेले कांबळे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली...
रोजी रोटीवर पोट भरणारी जनता या गुन्हेगारीच्या जाळ्यात ओढली जाते का? नागरिकांना सतर्क राहण्याची गरज
या सगळ्याचा विचार केला तर आता अस वाटायला लागलंय की रोहा शहर हे गुन्हेगारीचे शहर तर नाही ना होणार?..कारण रोहा तालुक्यात आसपासच्या परिसरातील ग्रामीण भागातील याठिकाणी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत..आणि आसपास घडणाऱ्या या वातावरणामुळे या परिसरातील नागरिकांच्या मनात आता भीती वाढताना दिसतेय....एकापाठोपाठ एक असे हे गुन्हेगारीचे प्रकार पाहून रोहा शहर हे गुन्हेगिरीच्या जाळ्यात ओढले तर जात नाही?ना याची चिंता येथिल जनतेला सतावतेय ..या सर्व घडलेल्या घटनामुळे रोहा तालुक्यातील जनतेमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आपणास पाहायला मिळते आहे...आता रोहा प्रशासनासहित नागरिकांनीही सतर्क राहण्याची गरज आहे...
