महाराष्ट्र वेदभुमी

आदर्श गाव धाटाव समजल्या जाणाऱ्या यशवंत ग्रामपंचायत धाटाव हद्दीतील आदिवासी वाडी राजिप प्राथमिक शाळेतील मुलांची शौचालयाची गैरव्यवस्था





रोहा धाटाव प्रतिनिधी (अनंता म्हसकर

आदिवासी वाडीवरील शौचालय व मुतारी घाणेरड्या स्वरूपाचे असून मुलांच्या आरोग्याचे तीन तेरा वाजविणारे शौचालय 

आदर्श गाव धाटाव आदिवासी वाडी राजिप प्राथमिक शाळा येथील शालेय मुलांची शौचालयाची गैरव्यवस्था होत असून अस्वच्छ परिसर शौचालयाच्या मोडकलेल्या खिडक्या जिथे दरवाजांचाच पत्ता नाही...शौचालयावर छप्पर नाही असे शौचालय...आजूबाजूला वाढलेले गवत अशी अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे... हे दृश्य पाहता आदिवासी वाडीवरील शौचालय व मुतारी हे अतिशय घाणेरड्या स्वरूपाचे असून मुलांच्या आरोग्याचे तीन तेरा वाजविणारे हे शौचालय असुन यांचा वापरच होत नाही...कारण बाजूने वाढलेले काटेरी गवत ,झुडूपे यामुळे विद्यार्थी आतमध्ये जाऊ शकत नाही...लहानलहान मुलांसाठी बांधण्यात आलेल्या या शौचालयाची हालत ही पूर्णपणे दयनीय स्वरूपाची झालेली आहे...त्यामुळे येथील विद्यार्थ्यांची अत्यंत गैरसोय होत आहे..

शिक्षक एक तर वर्ग चार आहेत... एक शिक्षक मुलांना शिकवितात कसे? मुळात हाच प्रश्न

तसेच रा.जि.प. प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे चार वर्ग असून या ठिकाणी शिक्षक एक तर वर्ग चार आहेत... एक शिक्षक मुलांना शिकवितात कसे मुळात हाच मोठा प्रश्न उपस्थित होत आहे...पहिली मध्ये ८) दुसरी मध्ये ६) तिसरी मध्ये ११) तर चौथी मध्ये १०) असे एकूण (३५) विद्यार्थी याठिकाणी शिक्षण घेत आहेत.. वर्ग खोल्या एकूण दोन आहेत...पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना इयत्ता तिसरीच्या वर्गामध्ये बसविले जात आहे व इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांना चौथीच्या वर्गामध्ये बसवून एकत्रित शिक्षण दिले जात आहे...असे दोन दोन वर्ग एकाच वर्ग खोलीत शिक्षण घेत असतील तर त्यांना दर्जेदार शिक्षण मिळणार कसे?


आजूबाजूचा अस्वच्छ परिसर पाहता लहान मुलांच्या जीवनाशी आरोग्याशी खेळ 

याकडे शिक्षण अधिकारी व स्थानिक ग्रामपंचायत यांनी लक्ष द्यायची गरज आहे...जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे असेच निदर्शनास येत आहे....आजूबाजूचा अस्वच्छ परिसर पाहता लहान मुलांच्या जीवनाशी आरोग्याशी खेळ होत असल्याचे दिसून येत आहे... ही बाब स्थानीक पंचायत आणि शिक्षण प्रशासनाने गभिर्याने घेण्याचे गरजेचे आहे...याकडे पंचायतीने तात्काळ लक्ष देऊन हा अस्वच्छ परिसर स्वच्छ करून शाळेची झालेली दुरवस्था सुधारित करावी...

Post a Comment

Previous Post Next Post