सिकंदर आंबोणकर प्रतीनिधी माणगाव
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथे कार्यक्रम संपन्न
लोकविकास सामाजिक संस्था आणि रायगड शिक्षण प्रसारक मंडळ, महाड यांच्या संयुक्त विद्यमाने अध्यक्ष हनुमंत (नाना) जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी नगराध्यक्ष स्नेहल माणिक जगताप यांच्या अध्यक्षतेखाली दि.२९ जुलै २०२३.रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला...
स्व.आमदार माणिकराव जगताप यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
स्व.आमदार माणिकराव जगताप यांच्या जयंतीनिमित्त माजी सनदी अधिकारी मा. श्री.अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यान आणि माणिक पुरस्कार सन्मान यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते...तसेच महाड आणि पोलादपूर तालुक्यातील एम.पी.एस.सी.परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला...या कार्यक्रमासाठी एक हजार विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती... तर यंदाचा पहिला माणिक पुरस्कार सिस्केपचे सागर मेस्त्री यांना सन्मानचिन्ह व गौरव पत्र तसेच रु २५०००/ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला...
हनुमंत जगताप यांचे नेतृत्व...
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप जाधव यांनी केले...तर सूत्रसंचालन सुधीर भाई शेठ यांनी केले...सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही संस्थेच्या पदाधिकारीनी अतिशय मेहनत घेतली होती...शेवटी रा.शि.प्र.चे कार्यवाहक महेंद्रशेठ पाटेकर यांनी सर्वांचे आभार मानले...तर हनुमंत (नाना) जगताप यांच्या नेतृत्वाखाली हा अतिशय नेत्रदीपक असा कार्यक्रम पार पाडण्यात आला.