महाराष्ट्र वेदभुमी

नवी मुंबई प्र. क्र.३४च्या विभागपदाची अक्षय कदम यांची विभाग सचिव पदावर नेमणूक

 


जान्हवी भोईर नवी मुंबई नेरूळ 


नवी मुंबई प्र. क्र.३४ च्या विभागपदाची अक्षय कदम यांची विभाग सचिव पदावर नेमणूक

मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडून दिले आदेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे नवीमुंबई प्र. क्र.३४च्या  विभाग पदी अक्षय कदम यांची निवड विभाग सचिव पदावर दि.२९/७/२३ रोजी नेमणूक करण्यात आली...महाराष्ट्र सेनेचे ध्येय, धोरणे व कार्यक्रम वेळोवेळी राबवावी यामध्ये कोणत्याही प्रकारची कुचराई किंवा तडजोड केली जाणार नाही... याची नोंद करण्यात आली...शिवाय सर्व सहकार्याकडून समाजाला कोणत्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही... अशा प्रकारचे वर्तन अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले...

मराठी बांधव भगिनी व माता यांना अभिमानास्पद कार्याची अपेक्षा

मराठी बांधव भगिनी व माता यांना अभिमान वाटेल अशा प्रकारचे कार्य अक्षय कदम व त्यांचे सहकारी यांच्याकडून घडावे...तसेच ही नेमणूक एक वर्षाच्या कालावधीसाठी असून वर्तणूक व कार्य अहवाल पाहून पुढील मुदतवाढ संदर्भात निर्णय घेतला जाईल..याची नोंद करण्यात आली...तसेच अक्षय कदम यांना त्याच्या पुढील कार्यासाठी शुभेछा देण्यात आल्या ...

अक्षय कदम यांनी विभाग सचिव पदावर नेमणूक केल्याबद्दल मानले आभार

तसेचे विभाग सचिव पदावर निवड केल्याबद्दल अक्षय कदम यांनी मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे, अमित ठाकरे तसेच नवीमुंबई शहर अध्यक्ष  गजानन काळे,नवी मुंबई शहर सचिव अभिजित देसाई यांचे मन:पूर्वक आभार मानले....तसेच पक्षाने दिलेल्या विश्वासाला पात्र ठरवत पक्षाची भूमिका प्रामाणिकपणे मांडण्याची नवीन जबाबदारी व निवड सार्थ करण्याचा प्रयत्न करेन असे अक्षय कदम यांनी सांगितले...

Post a Comment

Previous Post Next Post