महाराष्ट्र वेदभुमी

माणगाव दहीवली कोंड उपसरपंच संदीप पालकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत एकनिष्ठ..


 


माणगाव प्रतीनिधी अक्षय कदम 

दि.०१/०८/२०२३

माणगाव तालुक्यातील दहीवलीकोंड ग्रामपंचायतचे उपसरपंच संदीप पालकर हे काही दिवसापूर्वी महाड, माणगाव,पोलादपूरचे आमदार भरत गोगावले यांना खाजगी  कामासाठी भेटावयास गेले होते...त्यांची भेट झाल्यावर आमदारांसमवेत फोटो काढण्यात आला होता... आणि  तो फोटो सोशल मिडिया,वृत्तपत्र,स्थानिक वृत्तवाहिन्यावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधुन शिवसेना(शिंदे गटात) प्रवेश केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या... 

संदीप पालकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत एकनिष्ठ

परंतु त्या बातमीचे खंडन करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र वेदभूमी न्यूजसाठी  आमचे प्रतिनिधी अक्षय कदम यांच्याशी दि.१/८/२३ रोजी बोलताना असे सांगितले की महाविकास आघाडीच्या माध्यमातून ग्रामपंचायत निवडणुकीत मला जनतेने निवडून दिले आहे...आणि मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता असून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे   पक्षासोबत एकनिष्ठ आहे.... आणि मी अद्याप कोणत्याही दुसऱ्या पक्षात प्रवेश केलेला नाही...  आणि यापुढेही करणार  नाही...

Post a Comment

Previous Post Next Post