महाराष्ट्र वेदभुमी

कोलाड हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोलाडचे प्राचार्य शिरीष येरुणकर सेवा निवृत्त .

 

                    

           

कोलाड (श्याम लोखंडे ) 

प्राचार्य शिरीष येरुणकर सोमवार दि. ३१ जुलै २०२३ रोजी सेवानिवृत्त निरोपसमारंभ विशेष गौरव सोहळा 

रायगड जिल्ह्यात शैक्षिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या सुधागड एज्युकेशन सोसायटीचे कै. द. ग. तटकरे कोलाड हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोलाडचे प्राचार्य शिरीष येरुणकर हे वयोमानानुसार सोमवार दि. ३१ जुलै २०२३ रोजी सेवा निवृत्त झाले असुन त्यांच्या विशेष कार्याचा गौरव सोहळा व निरोप समारंभाससाठी त्यांचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी,सामाजिक, राजकीय, शैक्षणिक,वारकरी संप्रदाय,क्षेत्रातील मान्यवर तसेच कोलाड हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे सर्व शिक्षक, शिक्षेकत्तर कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

                


वयोमानानुसार सेवानिवृत्ती ठरली असली तरी शिरीष येरुणकर सर यांची सेवानिवृत्ती वेगळी आहे...कारण शिरीष येरुणकर यांचे शिक्षण ज्या शाळेत झाले त्याच शाळेत ते शिक्षक सेवेत रुजू झाले.ते अतिशय शिस्तप्रिय शिक्षक असून त्यांनी विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार केले...व त्यांनी कठोर मेहनतीच्या जोरावर छोट्या शाळेचे मोठया वटवृक्षात रूपांतर केले त्यामुळे ते याच हायस्कूलमध्ये प्राचार्य झाले... आणि याच हायस्कूल मधून ते सेवानिवृत्त झाले आहेत...

 प्राचार्य शिरीष येरुणकर सर भूगोल विषय शिकवीत असून  त्यांची भूगोल शिकवण्याची पद्धत इतकी सोपी होती कि सर्व विद्यार्थी त्यांनी दिलेले ज्ञान आत्मसात करायचे...याच बरोबर मुलांना मार्गदर्शन देऊन प्रोत्साहित करायचे... 

बहुजन समाजातील गोरगरीब विद्यार्थी यांच्यासाठी अनेक वेळा दिला मद्दतीचा हात 

  तसेच बहुजन समाजातील गोरगरीब विद्यार्थी यांच्यासाठी अनेक वेळा मद्दतीचा हात पुढे केला.यामुळे त्यांचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी, राजकीय सामाजिक शैक्षणिक व वारकरी संप्रदाय  क्षेत्रातील असंख्य मान्यवर उपस्थित राहून शिरीष येरुणकर सर यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post