महाराष्ट्र वेदभुमी

सामाजिक बांधिलकी जपत रोहा तालुक्यातील खातेलीवाडी येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप .


टीम परिवर्तन संस्थेचे कार्यकर्ते व ग्रामीण भागातील विद्यार्थी 

कोलाड (श्याम लोखंडे) 


टीम परिवर्तनच्या वतीने ग्रामीण भागात विद्यार्थी व गरजू विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप मोहीम 

रोहा तालुक्यातील खातेलीवाडी येथील आदिवासी पाड्यातील मुलांना टीम परिवर्तनच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले... या साहित्यात वह्या, कंपास, पॅड तसेच शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले....


टीम परिवर्तन मुंबई ठाणे परिसरातील समुह मंडळी राबवतात हे विविध उपक्रम

सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या तसेच सामाजिक बांधिलकी जपत असलेल्या टीम परिवर्तन या संस्थेला स्थानिक युवक उमेश ढुमणा यांचे मोलाचे सहकार्य टीम परिवर्तनला यावेळीं मिळाले...यावेळी टीम परिवर्तनाचे कार्यकर्ते तुषार वारंग, नामदेव येडगे, अविनाश पाटील,भुषण राजेशिर्के, अनिकेत चांदुरे यावेळीं उपस्थित होते... खेड्या पाड्यातील विद्यार्थ्याना शैक्षणिक सोयी सुविधांच्या अभावामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यांसाठी टीम परिवर्तनच्या वतीने सातत्याने शैक्षणिक साहित्य ग्रामीण भागातील विद्यार्थी व गरजूंना वाटप मोहीम घेण्यात येत आहे...टीम परिवर्तन हा प्रामुख्याने मुंबई ठाणे परिसरातील युवकांचा समुह आहे... ज्याद्वारे विविध उपक्रम ही युवक मंडळी राबवत असून शनिवार.दी २२ जुलै २०२३ रोजी हा उपक्रम खातेलीवाडी येथील विद्यार्थीना शैक्षणिक साहित्य वाटप करून करण्यात आला ...

स्थानिकांनी  मानले टीम परिवर्तनचे कार्यकर्ते तुषार वारंग यांचे आभार 

समाजासाठी समाजासोबत मिळुन एखादी समस्या किंवा प्रश्न कसा सोडवता येईल यांवर आमचा भर असतो... त्यामुळे आजवर अनेक गरजु वंचित घटकापर्यंत आम्हीं पोहचलो आहोत... असे टीम परिवर्तनचे कार्यकर्ते तुषार वारंग यांनी यावेळीं सांगितले... तसेच त्यांनी केलेल्या या उपक्रमाबाबत या संस्थेचे स्थानिक युवकांनी  टीम परिवर्तनचे कार्यकर्ते तुषार वारंग यांचे आभार  व्यक्त केले...


Post a Comment

Previous Post Next Post