सामाजिक संस्थां आणि राजकीय पक्षांची ४ ऑगस्ट२०२३. ला रोहा येथे बैठक
कोलाड (श्याम लोखंडे)
सोशल मीडियावर खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्यांविषयी नागरिकांकडून संताप व्यक्त
तालुक्यातिल युवा पिढी, कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांच्या आहारी गेलेला आहे... या गोष्टीला प्रतिबंध घालण्यासाठी तसेच वाममार्गाला लागलेल्या युवा पिढीला योग्य दिशा देण्यासाठी शुक्रवार दि. ४ ऑगस्टला सायंकाळी ५ वाजता रोहा येथील भाटे सार्वजनिक वाचनालय येथे सामाजिक संस्थां आणि राजकीय पक्षांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.. तालुक्यातील तरुण पिढी, हातावर पोट असलेला कष्टकरी वर्ग झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग म्हणून मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांकडे वळलेला आहे... नोकरदार वर्ग रोजची कमाई घालवून कर्जबाजारी होत आहेत... पैसे कमावण्याचा सोपा मार्ग म्हणून वाममार्गाला लागल्याने अनेकांचे आयुष्य उध्वस्त होत आहेत... तरुणाच्या आत्महत्या, मित्राची हत्या असे गंभीर गुन्हे यापूर्वी तालुक्यात घडलेले आहेत... सोशल मीडियावर खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्यांविषयी नागरिकांकडून संताप व्यक्त झाल्याने रोहा प्रेस क्लबने हे अवैध धंदे रोखण्यासाठी रोहा पोलिसांना निवेदन दिले आहे...
सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या एकत्रित बैठकीचे शुक्रवारी केले आयोजन
या घटनेनंतर सदर विषयी समोर आलेलं वास्तव अतिशय भयानक आहे... भविष्यात किमान रोहा तालुक्यात असे काही अघटीत व दुर्दैवी प्रसंग घडू नयेत... असंख्य कुटुंब, अनेकांचे संसार त्यामुळे उद्धवस्त होऊ नयेत...यासाठी प्रेस क्लबने रोहयातील सर्व सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या एकत्रित बैठकीचे शुक्रवारी आयोजन केले असल्याचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जाधव यांनी केलेल्या आवाहनात म्हटले आहे...
वाममार्गाला लागलेल्या युवा पिढीला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न
सर्वांनी एकत्रितपणे या गोष्टीला पायबंद घालण्यासाठी काही प्रयत्न, काही उपाययोजना करण्याची गरज आहे... या प्रयत्नांतून तालुक्यात जनजागृती झाल्यास किंवा लोक चळवळ उभी राहिल्यास वाममार्गाला लागलेल्या युवा पिढीला योग्य दिशा मिळू शकेल... तसेच त्रस्त असलेल्या त्याच्या कुटूंबियांना या प्रयत्नांतुन मदतीचा मोठा हात व दिलासा मिळणार असल्याचे जाधव यांनी शेवटी म्हटले आहे...