कोलाड (श्याम लोखंडे )
शेतकरी कामगार पक्षाचा ७६ वा वर्धापन दिन बुधवारी दि.२ ऑगस्ट रोजी सुधागड तालुक्यात श्री तीर्थ क्षेत्र बल्लाळेश्वर पाली नगरीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे...
शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्याला छत्रपती संभाजी राजे यांची विशेष लाभणार उपस्थिती...
शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्याला छत्रपती संभाजी राजे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे... या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाची बुलंद तोफ श्रमजीवी शेतकरी कष्टकऱ्यांचा आवाज राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जयंता भाई पाटील वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले आहे...
दि.२ ऑगस्ट रोजी सुधागड तालुक्यात श्री तीर्थ क्षेत्र बल्लाळेश्वर पाली नगरीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे...
रायगडाच्या राजधानीवर पुन्हा नव्याने काय घडेल का ? एकेकाळी संसदेसह राज्यात शेतकरी कामगार पक्षाची ताकद रायगडच्या राजधानीतून होती जनसामान्य माणसाला न्याय मिळून देणारा शेतकरी कामगार पक्षच एक खासदार सात आमदारांची कमांड असताना कधीही सत्तेची अभिलाषा बाळगली नाही...मात्र हाती सत्ता नसतानाही श्रमजीवी शेतकरी कष्टकरी कामगार यांना सातत्याने न्याय हक्कासाठी संघर्षाचा लढा देत त्याचे प्रश्न मार्गी लावणारा शेतकरी कामगार पक्ष रायगडच्या लाल किल्ल्यावर सदैव सत्ता विधिमंडळात जनतेच्या न्यायहक्कासाठी सरकारला सळो की पळो करून धारेवर धरून विविध प्रश्नांचे सातत्याने पाठपुरावा करत मार्गी लावणाऱ्या हूशेतकरी कामगार पक्षाचा आज वर्धापन दिन असल्याने या धर्तीवर जणू कार्यकर्त्यांना पर्वणीच ठरणार आहे...
जयंता भाई पाटील काय कानमंत्र देणार याकडेच साऱ्यांचे लक्ष...रायगडात नवे परीवर्तन घडण्याची गरज .
सद्याच्या परिस्थितीत शेतकरी कामगार पक्षापुढे खूप मोठी आवाहने असली तरी आजच्या मेळाव्यात पक्षाचे नेते दस्तुरखुद्द आमदार जयंता भाई पाटील कार्यकर्त्यांपुढे काय भूमिका घेतात गेली दोन ते तीन दशके खासदार नाही आमदारांचे देखील संख्याबळ कमी झाले... जिल्हापरिषदेवर एकहाती सत्ता मिळत नाही यावरच साऱ्यांचे लक्ष लागले असून राज्यातील सत्ता संघर्षनाट्यावर काय बोलणार यावरच साऱ्यांचे लक्ष लागले आहे...देशासह राज्यातील बळिराजा अक्षरशः मेटाकुटीला आला आहे...वाढती महागाईची टांगती तलवार धान्याला हमीभाव मिळत नाही... स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर तर केन्द्र सरकारचे लक्ष २०२४ च्या निवडणुकीकडे...तर राज्य सरकार दररोज वेगवेगळ्या भूमिका घेत आहेत...
अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे... शेतकरी नुकसाभरपाईच्या प्रतीक्षेत
एक वर्षाहून अधिक काळ प्रथमच रायगड जिल्हा परिषद पंचायत समिती नगर पालिका तसेच महापालिका यावर प्रशासकीय यंत्रणा आहे... मुंबई गोवा महामार्गचे काम गेली तेरा वर्ष रखडले...भुसंपादित भू धारकांचा प्रश्न प्रलंबित...अद्याप नागोठणे इंदापूर दरम्यानचे शेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहेत...त्यात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने रायगड सह कोकणाला पूरपरिस्थितीशी सामना करावा लागला आहे... त्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे... ते ही नुकसाभरपाईच्या प्रतीक्षेत असल्याचे बोलले जात आहे...
पंचायत समिती जिल्हा परिषद निवणुकीसाठी शेतकरी कामगार पक्ष काय रणनीती आखणार याकडेच साऱ्यांचे लक्ष
पाली लाल बावट्याने सजली आहे... तर हजारोंच्या संख्येने जिल्ह्यातील शेकापचे कार्यकर्ते या वर्धापदिनानिमित्त उपस्थितीत राहणार आहेत... त्यामुळे आजच्या शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनामित्ताने शेतकरी कामगार पक्षाचे नेते तसेच प्रमुख मान्यवर काय बोलणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले आहे...तर पुढील येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्षआपल्या पक्षासाठी काय रणनीती आखणार याकडेच साऱ्यांचे लक्ष वेधले आहे...
