महाराष्ट्र वेदभुमी

जलजीवन मिशन योजनेंतर्गत कामात खैरेखुर्द ग्रामपंचायत बेखबर...हर घर जल घोषित करणे विषयावरून ग्रामसभेत ग्रामस्थ आक्रमक...

 




रोहा: शहानवाज मुकादम 


हर घर जल घोषित करणे विषयावरून ग्रामसभेत ग्रामस्थ आक्रमक...



रोहा तालुक्यातील खैरेखुर्द ग्रामपंचायत कार्यालयात विषेश सभा घेण्यात आली, सदर सभेत विषय क्र:४ गावे ODF+ घोषित करणे व विषय क्र:५ गावे हर घर जल घोषित करणे या दोन विषयावरून खैरेखुर्द ग्रामस्थ आक्रमक झाले..

जल योजनेबाबत कोणतीही माहिती नसल्याची सदर विषया संदर्भात पंचायत समिती रोहा आणि रायगड जिल्हा परिषद पत्र व्यवहार करण्याबाबत सर्वांमते ठराव मंजूर

दि:०१/०८/२३, रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात आली होती...खैरेखुर्द गावात अस्वच्छता असुन जनजीवन मिशन योजनेचे काम जानेवारी २०२३, रोजी पाण्याच्या टाकीचे कॉलम चे काम सुरु झाले असताना सदरचे काम अर्धवट अवस्थेत काम बंद आहे..तसेच ग्रामपंचायत खैरेखुर्दचे सरपंच व ग्रामसेवक यांना या जल योजनेबाबत कोणतीही माहिती नसल्याची सदर विषया संदर्भात पंचायत समिती रोहा आणि रायगड जिल्हा परिषद यांना पत्र व्यवहार करण्याबाबत सर्वांमते ठराव मंजूर करण्यात आला आहे...

ग्रामस्थांकडून जल जीवन मिशन योजनेचे ठेकेदार यांना ग्रामपंचायत खैरेखुर्द कडून नोटीस बजावण्यात येण्याची  मागणी 

 ग्रामसभेत ग्रामस्थांकडून जल जीवन मिशन योजनेचे ठेकेदार यांना ग्रामपंचायत खैरेखुर्द कडून नोटीस बजावण्यात यावी आशी मागणी करण्यात आली...खैरेखुर्द गावातील पाण्याची टाकी नादुरुस्त असल्याने सदरची टाकी ४० हजार लिटर क्षमतेची मागणी सर्वेसाठीआलेल्या अधिकाऱ्यांकडे गावचे ट्रस्ट अध्यक्ष श्री. अब्बास मुकादम व अध्यक्ष श्री.आजीम धनसे आणी पत्रकार श्री शहानवाज मुकादम यांनी केली होती.. त्यानुसार सदरचे योजनेचे काम लवकरात लवकर सुरु करण्याचे काम  करण्यासाठी ग्रामपंचायत खैरेखुर्द कडून कारवाई करण्याची मागणी ही ग्रामसभेत करण्यात आली...

ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतेही दाखले देण्यात येऊ नये... अशी सुचनस खैरेखुर्द ग्रामस्थांकडून सरपंच व ग्रामसेवक यांना देण्यात आली आहे...

 सदरच्या जलजीवन योजनेचे बिल मिळण्याबाबत ग्रामपंचायत कडून कामाची पाहणी केल्याशिवाय व खैरेखुर्द ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतेही दाखले देण्यात येऊ नये... अशी सुचना खैरेखुर्द ग्रामस्थांकडून सरपंच व ग्रामसेवक यांना देण्यात आली आहे... व ते सरपंच ग्रामसेवक यांनी मान्य केले आहे... तसेच सदर सभेच्या ठरावाची प्रत गावातील अध्यक्ष यांना देण्यात येइल... अशी ग्रामसेवक श्री आप्पासाहेब कांबळे यांनी कबुल केले आहे...


जल जीवन मिशन योजनेबाबत संबंधित विभागाडे तक्रार करणार दाखल.. अध्यक्ष श्री.आजीम धनसे म्हणाले..

सदर सभेला गावचे अध्यक्ष श्री.आजीम धनसे  श्री.अब्बास मुकादम,सचिव श्री.गणी पेडेकर,खैरेखुर्द पोलीस पाटील श्री.रउफ पित्तु,श्री अ.कादीर पिततु,इफतिखार धनसे,सादिक खोत,कमाल धनसे,शरफुद्दीन मुकादम,अमित साळावकर,सर्व ग्रामपंचायत सदस्य,नरेश देवळे,भगवान यादव,बशीर धनसे,उप सरपंच श्री जुबैर धनसे हे उपस्थित होते...सदरच्या जल जीवन मिशन योजनेबाबत संबंधित विभागाडे तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे  खैरेखुर्द गाव अध्यक्ष श्री.आजीम धनसे म्हणाले...

Post a Comment

Previous Post Next Post