महाराष्ट्र वेदभुमी

तळा- वाजळोशी- साई एस.टी. बससेवा सुरू... साई विभागातील विद्यार्थी व जनतेला दिलासा

     


   

सिकंदर आंबोणकर प्रतिनिधी तळा

ळा- वाजळोशी- साई एस.टीची बससेवा सुरू झाल्याने साई विभागातील विद्यार्थी व जनतेला आता दिलासा मिळाला आहे...

एस.टी.महामंडळाने  साई बससेवा.सुरू केली आहे...त्यामुळे साई,काकल,उसरबुद्दुक, वांजळोशी या दुर्गम भागातील विद्यार्थी,शेतकरी व पंचक्रोशीतील जनतेला आता फार मोठा दिलासा मिळाला आहे...

नागरिकांसाठी बससेवा सुरू असणे ही अत्यंत गरज भासत होती...

साई,काकल, उसरबुद्दुक,वांजळोशी हा फार मोठा दुर्गम व ग्रामीण भाग आहे... त्यामुळे, दळणवळणासाठी येथील विद्यार्थी आणि जनतेची फार मोठी अडचण होत होती...त्यामुळे येथील नागरिकांसाठी बससेवा सुरू असणे ही अत्यंत गरज भासत होती...त्यासाठी ही बससेवा सुरु व्हावी... आणि येथील नागरिकांचा रोज होणारा त्रास कमी व्हावा यासाठी प्रयत्न करून ही बससेवा सुरू करण्यात आली आहे.....

जेष्ठ समाजसेवक आणि सहकारी वर्ग यांनी केले मोठे प्रयत्न...

यासाठी जेष्ठ समाजसेवक गजानन अधिकारी,अशोक राणे, बळीराम लाड,अशोक मोहिते,गणेश पवार,पांडुरंग मोरे,लोकमान्य ज्ञानदीप विद्यामंदिर साई हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.पाटील आणि सहकारी वर्ग यांनी फार मोठे प्रयत्न केले...तसेच ही एस.टी बससेवा सुरू झाल्यामुळे या भागातील प्रत्येक नागरिक, शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी तसेच गोरगरीब जनता या सर्वांनाच फार मोठा दिलास मिळाला आहे.. शिवाय पंचक्रोशीतून एक आनंदाचे वातावरण दिसून येत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post