महाराष्ट्र वेदभुमी

घरेलु गॅस वाहतूक करणारा पिकप टेम्पो खांब देवकान्हे मार्गावर कलंडला,


कोलाड प्रतिनिधी श्याम लोखंडे 

घरोघरी गॅस बाटला वाहतूक करणारा पिकप टेम्पो खांब देवकान्हे मार्गावर कलंडला... सुदैवाने कोणतीही दुर्दैवी घटना घडलेली नाही

 खांब परीसरात घेरलू गॅस पुरवठा करणारा कोलाड येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे शुभम गॅस सर्व्हिसचा घरोघरी गॅस बाटला वाहतूक करणारा पिकप टेम्पो खांब देवकान्हे मार्गावर कलंडला... मात्र सुदैवाने कोणतीही दुर्दैवी घटना घडलेली नाही... वाहतूक करणारा टेम्पो कलंडल्याने वाहन चालकाची एकच खळबळ उडाली होती...

शुभम गॅस एजेंसी ही गावा गावात गॅस पुरवठा करणारी एजेंसी...कोलाड सह खांब परिसरातील गावांना तसेच ग्राहकांना बुकिंगप्रमाणे देते घरपोच सुविधा 

कोलाड येथील शुभम गॅस एजेंसी ही गावा गावात गॅस पुरवठा करणारी एजेंसी आहे... या एजेन्सीच्या माध्यमातुन कोलाड सह खांब परिसरातील गावांना तसेच ग्राहकांना बुकिंगप्रमाणे घरपोच सुविधा दिल्या जातात... मंगळवारी १ऑगस्ट रोजी घरेलु गॅस पुरवठा करणारा पिकप टेम्पो खांब देवकान्हे मार्गावर धानकान्हे नजिक रस्त्याच्या कडेला कलंडला आहे....परंतु सदरच्या घटनेत सुदैवाने कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही...

देवकान्हेकडून खांबकडे जाणाऱ्या प्रवाशी रिक्षाला साईड दिल्यामुळे सदरचा टेम्पो रस्त्याच्या कडेला खचल्याने घडली घटना

वाहन चालकांनी  रस्त्यावरून दुसऱ्या वाहनास साईड देताना हा टेम्पो कलंडला आहे... मात्र यात कोणीही जखमी झाले नसून कोणताही  धोका निर्माण झालेला नाही....कोलाड येथून नेहमीप्रमाणे घरेलु गॅस वाहतूक करणारा टेम्पो क्रमांक एम एच ०६ बी जी ४०६६ हा खांबकडून देवकान्हेकडे जात असताना  देवकान्हेकडून खांबकडे जाणाऱ्या प्रवाशी रिक्षाला साईड दिल्यामुळे सदरचा टेम्पो रस्त्याच्या कडेला खचल्याने ही घटना घडली आहे...

शुभम गॅस एजेंसिने तत्काळ उपाय योजना म्हणून क्रेनच्या सहाय्याने टेम्पो बाहेर काढले

घरेलु गॅस वाहतूक करणारा टेम्पो चालकाने अतिशय प्रसंगावधान दाखवित कोणत्याही प्रकारे धोका निर्माण होणार नाही... प्रथम याची काळजी  घेत आतमध्ये असलेले गॅस बाटले सुरक्षित केले.. यामुळे सुदैवाने कोणतीही दुर्देवी घटना घडली नाही.. तसेच शुभम गॅस एजेंसिने तत्काळ उपाय योजना म्हणून क्रेनच्या सहाय्याने टेम्पो बाहेर काढले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post