महाराष्ट्र वेदभुमी

*मुख्याध्यापिका मानसी पेठे आपल्या प्रदीर्घ सेवेमधुन सेवानिवृत्त*


सिकंदर आंबोणकर गोरेगाव प्रतिनिधी माणगाव

 मुख्याध्यापिका मानसी मंगेश पेठे सेवानिवृत्त...

माणगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित र.का.गांधी बालवाडी व प्राथमिक विद्यामंदिर गोरेगावच्या मुख्याध्यापिका मानसी मंगेश पेठे या दि.२८ जुलै २०२३ रोजी आपल्या सेवेतून निवृत्त झाल्या... १९९७ साली मुख्याध्यपिका या पदावर त्या शाळेत रुजू झाल्या होत्या... त्यांनी आपल्या २६ वर्षाच्या सेवेत अनेक विध्यार्थी घडवले...आणि आज तेच विध्यार्थी मोठमोठ्या शासकीय व निमशाककिय सेवेत.ते पदसिद्ध अधिकारी म्हणून आपले नाव कमवीत आहेत...

शिक्षक व शिक्षका सुद्धा झाल्या भावुक

मानसी पेठे या सेवेतून निवृत्त होत असताना फार भावुक झाल्या होत्या... यावेळी उपस्थित असलेला प्रत्येक शिक्षकांनी आपल्या भाषणातून आपले मनोगत व्यक्त केले... त्यावेळी त्यांनी मानसी पेठे यांनी केलेल्या कार्याचे गुणगाण व्यक्त केले... त्यांच्या सहकारी शिक्षक व शिक्षका सुद्धा अत्यंत भावुक झाल्या होत्या...

उपस्थितांनी दिल्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा...

सेवापूर्तीच्या या  कार्यक्रमावेळी मा. ता. एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्रीनिवास बेंडखळे,उपाध्यक्ष अरुणा शेट,सचिव प्रसाद मराठे,खजिनदार विवेक दोशी,सदस्य मंगेश पेठे, प्रसाद मेहता,अरविंद म्हशेळकर,रावळ सर, भालेराव मॅडम,तसेच शाळेचे सर्व शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते...

त्यावेळी सर्व उपस्थितांकडून त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या...

Post a Comment

Previous Post Next Post