मुंबई गोवा महामार्गावर अद्याप खड्ड्यांची मालिका सुरूचआहे.मोठमोठाले पडलेले खड्डे आणि त्यामध्ये साचलेले पावसाचे पाणी त्यामुळे वाहनचालकांना याचा अंदाज येत नसल्याने वाहनचालकाला वाहन चालवताना खूप मोठी अडचण होत आहे.त्यामुळे रस्त्यावरील या खड्ड्यांची आता मोठी डोकेदुखीच झालेली आहे..पनवेल, पेण, वडखळ, नागोठणे,खांब, कोलाड,या सर्वच ठिकाणी रसत्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे.यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.नागरिकांसाठी तर ही एक गंभीर समस्या होऊन राहिली आहे.शिवाय या समस्येमुळे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.प्रवासी वाहन चालक चाकरमणी नागरिक या सगळ्यांनाच याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.तसेच एखादा अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेताना विलंब लागतो.आणि वेळीच उपचार न मिळाल्याने रुग्नानंचा जीव दगावतो.
या सगळ्याला जबाबदार कोण?असा सवाल प्रत्येक नागरिकांना सतावत आहे.महामार्गाची ही अवस्था अत्यंत दयनीय आणि संतापजनक आहे. या अवस्थेला जबाबदार कोण?आणि प्रशासन याकडे लक्ष देणार तरी कधी?मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्यांचे काम पूर्ण होणार तरी कधी?असा सवाल प्रत्येक नागरिकांच्या मनात सतावत आहे.प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन हे काम पूर्ण करावे.