कोरळवाडी येथील इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतची प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून लहान मुलांना शिक्षणासाठी दूरवर जावे लागत आहे... तसेच कोरळवाडी आणि दाभोळवाडी येथे सुमारे दहा महिन्यांपूर्वी मंजूर झालेल्या अंगणवाडी इमारतींचे बांधकाम अद्याप सुरू झालेले नाही... जबाबदार ग्रामविकास अधिकारी, ठेकेदार, महिला बालकल्याण अधिकारी आणि वनजमीन हस्तांतरण प्रस्तावास वीलंब केला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे... अंगणवाडी नसल्यामुळे येथील बालकांना सुरक्षित व आवश्यक सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे... या संदर्भात आपटा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया देत आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे... ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू असून कोरलवाडी येथील सुवर्णा गूरूदास वाघे, प्रगती राजेश वाघे, सोनाली संतोष पवार या महिलाही उपोषणात सहभागी झाल्या आहेत... जोपर्यंत बंद प्राथमिक शाळा पुन्हा सुरू केली जात नाही आणि अंगणवाडी बांधकामास तात्काळ सुरुवात होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा ठाम इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे... या आंदोलनाला आपटा पंचायत समिती सदस्य मयूर शेलार, कोळखे पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील, स्वप्नील भोवड, गुळसुंदे ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील तसेच ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे पदाधिकारी राजू पाटील, जयवंत पाटील, राजेश रसाळ, रोहिणी ठाकूर आदींनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला...
दरम्यान संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पनवेल पंचायत समितीचे उपसभापती गटविकास अधिकारी व उपोषणकरच्या प्रतिनिधींसोबत चर्चा झाली परंतु जोपर्यंत प्रत्यक्ष कृती होत नाही तोपर्यंत उपोषण थांबणार नाही या निर्णयावर उपोषण करते ठाम असल्याने अजूनही उपोषण सुरू आहे... पटसंख्येच्या नावाखाली प्राथमिक शाळांचे समायोजन करण्याच्या निर्णयामुळे चालू वर्षी रायगड जिल्ह्यात सुमारे ११३५ प्राथमिक शाळा बंद पडण्याच्या अवस्थेत असून या निर्णयाचा मोठा फटका दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी समाजावर झाला आहे... त्यामुळे शासनाने आदिवासी वाड्यावरील बंद केलेल्या शाळा तात्काळ सुरू कराव्या तसेच कोरलवाडी आणि दाभोळवाडी येथील अंगणवाडीच्या मागणीसाठी पनवेल पंचायत समितीसमोर आदिवासी बांधवांसह आमरण उपोषण सुरू केले आहे...
