महाराष्ट्र वेदभुमी

कु.माहिरा इब्राहिम शरीफ हिने पूर्ण केले आयुष्यातील पहिल्या रमजान महिन्याचे रोजे

सोगांव-:अब्दुल सोगावकर : रायगड जिल्यातील अलिबाग शहरातील गोविंद बंदर येथील मुस्लिम समाजातील इब्राहिम शरीफ यांची ६ वर्षीय कन्या कु. माहिरा इब्राहिम शरीफ हिने भर उन्हाळ्यात आयुष्यात पहिल्ल्यांदाच तहान भूक विसरून रमजान महिन्याचे ३० दिवसांचे रोजे (उपवास) पूर्ण केले. याबद्दल तीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे...

इस्लाम धर्मातील कलमा, नमाज, रोजे, जकात, हज हे पाच प्रमुख अर्क आहेत, हे पूर्ण करणे प्रत्येक मुस्लिम समाजातील लहानांपासून मोठ्यांपर्यंतच्या महिला व पुरुषांना कोणत्याही परिस्थितीत बंधनकारक आहेत. अध्यात्मिकची ओढ अगदी लहानपणापासूनच लागावी यासाठी मुलामुलींना रोजे व नमाज पूर्ण करण्यासाठी इस्लाम धर्मात बंधनकारक करण्यात येत आहे... याच अनुषंगाने अगदी लहान वयातच माहिरा इब्राहिम शरीफ हिने रमजानच्या पूर्ण महिन्यातील रोजे पूर्ण केले आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post