शासकीय जागेवर बांधले घर ; गमवावे लागले ग्रा.पं. सदस्यपद
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:-शासकिय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी रामटेक तालुक्यातील सोनेघाट येथील दोन ग्रामपंचायत सदस्यांना चांगलेच भोवले... जितेंद्र जीवनरामजी वालोकर व ममता शिवप्रसाद सोरते अशी नाव आहे... अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ कलम १४ (१) (ज-३) अन्वये अपात्र ठरविल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे... ग्रामपंचायत सोनेघाट येथील सदस्य आम्रपाली बंडू भिवगडे यांनी ८ मे २०२४ अपर रोजी अप्पर जिल्हाधिकारी न्यायालयात अर्ज दाखल केला होता... अर्जात नमूद केल्याप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र वालोकर आणि ममता सरोते यांनी वनविभागाच्या शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याच्या आरोप करण्यात आला होता... जितेंद्र वालोकर यांच्या प्रकरणात तहसीलदार यांनी केलेल्या चौकशी अहवालानुसार सदर जागा महाराष्ट्र शासन ( आखर गोठाण ), सर्वे क्रमांक १४ आराजी १.१९ हे. आर अंतर्गत येत असल्याने नमूद करण्यात आले... ती शासन मालकीची जागा असल्याने अतिक्रमण सिद्ध झाले... तसेच ममता सरोते यांच्या प्रकरणात तहसीलदार सादर केलेल्या चौकशी अहवालानुसार महाराष्ट्र शासन वनविभाग सर्वे क्रमांक १४ आरजी १.१९ हे. आर (इतर अधिकार- आखर गोठाण) या जमिनीवर ३३० चौरस फूट जागेवर घर बांधून राहत असल्याचे स्पष्ट झाले... ग्रामपंचायत नमुना आठ व कर आकारणी नमुना नऊ मध्येही त्यांच्या राहत्या घराची नोंद असल्याचे आढळले... त्यानुसार अप्पर जिल्हाधिकारी यांनी ममता शिवप्रसाद सरोते सदस्य ग्रामपंचायत सोनेघाट, तहसिल रामटेक यांना व जितेंद्र जिवनराव वालोकर सदस्य ग्रामपंचायत सोनेघाट, तहसिल रामटेक यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम १४ (१) (ज-३) अन्वये ग्रामपंचायत सदस्य पदाकरीता अपात्र ठरवले आहे...
