सोगाव - अब्दुल सोगावकर ; अलिबाग तालुक्यातील सोगाव येथे वसीम कुर पुरस्कृत 'क्लासिक चॅम्पियन ट्रॉफी' रात्रीच्या प्रकाशझोतातील भव्य क्रिकेट स्पर्धांचे शुक्रवार दि. ०३ एप्रिल २०२६ व शनिवार दि. ०४ एप्रिल २०२६ रोजी क्लासिक सोगाव क्रिकेट मैदानावर आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अंतिम सामना स्पर्धेत जॅक स्पॅरो बोडणी पुरस्कृत जय मल्हार अलिबाग संघ व वसीम कुर पुरस्कृत ए ३ सोगाव या संघामध्ये होऊन अटीतटीच्या लढतीत जॅक स्पॅरो बोडणी पुरस्कृत जय मल्हार अलिबाग संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक २,२२,२२२ रुपये रोख व आकर्षक चषक पटकावले...
या स्पर्धेत द्वितीय क्रमांक वसीम कुर पुरस्कृत ए ३ सोगाव संघाने पारितोषिक १,११,१११ रुपये व आकर्षक चषक पटकावले, तर तृतीय क्रमांक संस्था ११ कुरुळ संघाने पटकावले. स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज म्हणून जय मल्हार संघ अलिबाग संघाचा ओम केणी याने पटकविले तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ए ३ सोगाव संघाचा असीम कुर याने पटकविले आणी मालिकावीर म्हणून संस्था ११ कुरुळ संघाचा प्रसाद म्हात्रे याने पटकविले. यामध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षकचा मान म्हणून ए ३ सोगाव संघाचा साकीब कुर याला देण्यात आला. सर्व विजयी संघाना व खेळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ५एप्रिल रोजी सकाळी झालेल्या बक्षीस समारंभात मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेचे उद्घाटन समारंभ शुक्रवार दि. ३ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता राजिपचे विद्यमान सदस्य दिलीप उर्फ छोटमशेठ भोईर यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आले.... स्पर्धा काळात अलिबाग मुरुड रोहा मतदार संघाचे आमदार महेंद्र दळवी, रा.जि.प. सदस्य दिलीप भोईर, अमित नाईक, किहीम सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड, जितेंद्र बेर्डे, शिवसेना(शिंदे गट) अलिबाग तालुका प्रमुख उमेश म्हात्रे, शिवसेना(शिंदे गट)अलिबाग तालुका प्रमुख युवा सेना प्रमुख संदेश थळे, अलिबाग पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्या स्नेहा रुत, मापगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विजय भगत, मजीद कुर, जगन्नाथ पाटील, ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगांवचे सर्व सदस्य, तसेच जमातुल मुस्लिमिन सोगांव कमिटीचे अध्यक्ष मुरतुजा कुर, व इतर सदस्य, यासोबतच काळभैरव सोगांव मंडळ आगरआळी, जय हनुमान मंडळ मुनवली, जय हनुमान मंडळ चोरंडे आदी मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने आयोजकांना व खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. तसेच भव्य क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमीं व खेळाडू यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. स्पर्धा घर बसल्या पाहता येतील यासाठी युट्यूब वर थेट प्रक्षेपणची(लाइव्ह) सुविधा उपलब्ध करण्यात आली होती...
यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, वसीम कुर व मुदस्सर कुर यांनी भव्य क्रिकेट स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन व नियोजन केले आहे, असे सांगून कौतुक केले व या क्रिकेट मैदानावर मी देखील एकेकाळी क्रिकेट स्पर्धा खेळलो आहे, असे सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला...
स्पर्धेत पंचांनी उत्तम कामगिरी बजावली तर समालोचन अतिशय चांगल्या प्रकारे झाले... यावेळी स्पर्धेत समालोचन आकाश मांजरेकर, निखिल पडते, यश मापगावकर, सुहास फाटक यांनी करत सर्वांचीच मने जिंकली... स्पर्धेचे संपूर्ण सूत्रसंचालन अजित हरवडे सर यांनी केले... स्पर्धा चांगल्यारीतीने पार पाडण्यासाठी वसीम कुर व त्यांच्या मित्रपरिवारांनी तसेच सोगाव ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली... यावेळी सर्व स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली...
फोटो लाईन :सोगाव येथे वसीम कुर पुरस्कृत 'क्लासिक चम्पियन ट्रॉफी' क्रिकेट स्पर्धेत जॅक स्पॅरो बोडणी पुरस्कृत जय मल्हार अलिबाग संघाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस देताना उपस्थित मान्यवर,
