महाराष्ट्र वेदभुमी

एसडीओची ट्रेडींग कंपनीला आकस्मिक भेट

 

सचिन चौरसिया 

रामटेक :- तालुक्यातील नगरधन येथील मोहित ट्रेडिंग कंपनी ला उपविभागीय अधिकारी रामटेक प्रियेश महाजन यांनी आकस्मित भेट दित आगामी खरीप हंगामाकरिता उपलब्ध बियाणे, कीटकनाशक, खताबाबत चौकशी केली... यावेळी नियमानुसार दुकानाची तपासणी करण्यात आली... यासोबतच खताच्या गोडाऊन ला भेट देत ई-पॉस मशीन मधील साठा व प्रत्यक्ष उपलब्ध साठा याचा ताळमेळ यावेळी घेण्यात आला... खताचा सुरळीत पुरवठा व विक्री व्हावी तसेच ई-पॉस मशीन नुसार विक्री करावी, साठा रजिस्टर अद्यावत ठेवावा व नियमानुसार सर्व कार्यवाही करावी अश्या सूचना यावेळी देण्यात आल्या... नियमांचा भंग केल्यास कठोर कार्यवाही करण्यात येईल अशा इशारा कृषी केंद्र धारकाला यावेळी देण्यात आला... याप्रमाणे तालुक्यातील सर्व कृषी केंद्रांची तपासणी करून गैर प्रकार आढळुन आलेल्या कृषी केंद्रावर कार्यवाही करण्याचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांना सांगण्यात आले... यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी रामटेक ग्रीष्मा डेहणे, तालुका कृषी अधिकारी रामटेक सुनील कोरटे, कृषी अधिकारी (गु नि) रामटेक जितेंद्र दमाहे उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post