महाराष्ट्र वेदभुमी

रा जि प शाळा देवकान्हे येथे आजी-माजी विद्यार्थी संघाची अधिकृत स्थापना

रोहा वार्ताहर : रायगड जिल्हा परिषद प्राथमिक डिजिटल शाळा देवकान्हे, स्थळ देवकान्हे येथे सोमवार दि.२३ मार्च २०२६ रोजी वेळ सकाळी १०:०० वा.  सर्व माजी विद्यार्थ्यांची बैठकी आयोजित करण्यात आली... या बैठकीस आवर्जून उपस्थित राहण्याची आजी माजी विद्यार्थ्यांना विनंती करण्यात आली.... यावेळी शाळेची प्रगती,  अनेक सोयीसुविधां या अनुषंगाने कार्यकारी समितीची निवड करून आजी-माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली.... एक छोटासा सहभाग शाळेचेच नव्हे तर विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करू शकतो... केवळ विद्यार्थ्यांचा भवितव्यासाठी पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा देऊन  शाळेच्या प्रगतीसाठी एकत्र येऊन नव्याने काम करण्याची उमेद घेऊन या समितीने हा एक पाऊल प्रगतीचाच नव्हे तर प्रगती करून नवे यश संपादन करण्याचा उद्देश हाती घेऊन सहभाग नोंदविला आहे... त्यांच्या कार्याला देवकान्हे गावातील अनेक होतकरू माजी विद्यार्थ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे...

बैठकीचे विषय:

१. आजी-माजी विद्यार्थी संघाची अधिकृत स्थापना करणे.

२. कार्यकारी समितीची निवड करणे.

३. शाळेच्या प्रगतीसाठी व सोयीसुविधांसाठी भविष्यातील नियोजनावर चर्चा करणे.

 समस्त देवकान्हे ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य सदस्या व शिक्षक वर्ग, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री.सहादेव लक्ष्मण भोईर, उपाध्यक्ष श्री. अविनाश भरत कान्हेकर खजिनदार श्री.रुपेश वसंत जवरत, पालक प्रतिनिधी श्री. दिनेश सहादेव भोईर, सदस्य शुभम भोईर, सुमित भोईर, राज जाधव, अमृता भोईर अशा प्रकारे उपस्थित माजी विद्यार्थी यांच्या सहकार्याने माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यात आला..

Post a Comment

Previous Post Next Post