मुंबई प्रतीनिधी:(सतिश पाटील): लोणावळ्यातील कार्ला एकविरा देवीच्या चैत्र यात्रेत २६ मार्च २०२६ रोजी रात्री पालखी प्रस्थानानंतर दोन गटांत, विशेषतः पनवेल आणि कल्याण कोळीवाडा, हाणामारी व दगडफेक झाली...पालखी पुढे नेण्याच्या कारणावरून हा वाद पेटला असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु यामुळे यात्रेला गालबोट लागले आहे...
घटना...वाद...मारामारी...गट...परिणाम...
कार्ला आई एकविरा देवीची चैत्र यात्रेत दरम्यान घडली... २६ मार्चच्या मध्यरात्री दोन गटांत पालखीवरून वाद...एकमेकांवर दगडफेक आणि हाताला मिळेल ते फेकून मारण्याचा प्रकार... पनवेल कोळीवाडा आणि कल्याण कोळीवाडा मधील तरुण...पोलीस बंदोबस्त तैनात, परिस्थिती नियंत्रणात, मात्र भक्तांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते... काही वेळात शांत करण्यात आले मात्र दुसऱ्या दिवशीही बाचाबाची झाली..
सुत्राच्या माहितीनुसार या दोन्ही गटाचा वाद जुनाच होता... आपण देव दर्शनाला मुलाबाळासह हौसमौज करायचे सोडून असे प्रकार नेहमीच होत असतात यावर प्रशासन, कार्ला देवस्थान काही उपाय योजना करतील अशी अपेक्षा करूया याने समाजाचे नाव मलीन होते याचे भान या मंडळीने घ्यावी अशी आई एकविरा चरणी प्रार्थना आहे... अशा मंडळांना बंदी घालण्यात यावी जेणेकरून समाजात तेड निर्माण होऊ नये...अहवालानुसार, या घटनेनंतर काही काळ परिसरात तणाव होता, परंतु आता परिस्थिती शांत करण्यात पोलीसाना यश आले आहे...तरी अफवांवर विश्वास ठेवू नये...
