महाराष्ट्र वेदभुमी

धास्ती इंधनाची ; पेट्रोल पंपांवर नागरिकांची तुफान गर्दी…

५०रुपयापासून ते ६ हजारांपर्यंत वाढली वस्तुस्थिती

सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक :- आखाती देशातील युद्धाच्या परिणाम इंधनाच्या पुरवठ्यावर होत आहे... आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे शहरात पेट्रोल टंचाई निर्माण झाल्याची अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरल्याने बुधवार-गुरुवार रामटेक शहरात गॅस एजन्सीसह पेट्रोल पंपांवर अभूतपूर्व गर्दी उसळली... शहरापासून ग्रामीण भागापर्यंत सर्वत्र वाहनांच्या लांब रांगांनी धास्ती स्पष्टपणे दिसून आली... रामटेकमध्ये एकूण पाच पेट्रोल पंप असतानाही, राखी तलाव परिसरातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावरच इंधन उपलब्ध असल्याने तेथे  सकाळपासूनच वाहनांची वर्दळ वाढली... अनेक नागरिकांना भविष्यात इंधन मिळणार नाही या भीतीने अतिरिक्त साठा करण्याच्या प्रयत्न केला... इंधन भरण्यासाठी नागरिकांना लांबच लांब रांगेत उभे राहावे लागले... कोणत्या पंपावर पेट्रोल उपलब्ध आहे, याची माहिती घेण्यासाठी नागरिक वारंवार चौकशी करत होते... पेट्रोल उपलब्ध झाल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने नागरिक संबंधित पंपांवर दाखल होतात... ग्राहक भीतीपोटी आवश्यकतेपेक्षा जास्त पेट्रोल आणि डिझेल खरेदी करीत आहेत... एरव्ही ज्यांना जेवढी गरज आहे तेवढेच इंधन घेण्याचा ग्राहकाचा कल होता... तो गेल्या दोन ते तीन दिवसात विस्कळीत झाला आहे... पुरवठ्याचे गणित आणि त्याची असलेली पुरवठ्याची श्रृंखला विस्कळीत झाल्यामुळे पेट्रोलपंपांवर पेट्रोल संपल्याचे फलक लागत असल्याचे चित्र आहे... या संपूर्ण परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पेट्रोल व गॅसचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी जोर धरत आहे... इंधन टंचाईमुळे दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत असल्याने लवकरात लवकर उपाययोजना करण्यात याव्यात, याबाबत पेट्रोल पंप चालक अजिंक राघोर्ते यांनी सांगितले की, पूर्वी एक टँकरचा साठा तीन दिवस चालायचा, मात्र आता तोच साठा एका दिवसात संपत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे... अशी अपेक्षा व्यक्त केली...

साधारणतः शहरात वाहनधारक दोन चाकी वाहनात दररोज लोक ५० ते १०० रुपयांपर्यंत पेट्रोल भरत होते... ते आता ५०० ते ८०० रुपयांचे पेट्रोल भरत आहेत... चारचाकी वाहनांच्या बाबतीतही एरव्हीची खरेदी ३०० ते ६०० रुपये प्रति ग्राहक होती... ती आता २ ते ६ हजारांपर्यंत वाढली ही वस्तुस्थिती..

Post a Comment

Previous Post Next Post