कोलाड ( श्याम लोखंडे ): वारकरी संप्रदाय परंपरा लाभलेल्या रोहा तालुक्यातील नामवंत अशा श्रीसंत सेवा मंडळ खांब पंचक्रोशीचा ६९ वे अखंड हरिनाम सप्ताहास श्री क्षेत्र चिल्हे येथे सोमवारी ९ मार्च रोजी प्रारंभ झाला आहे.९ मार्च ते १६ मार्च या कालावधीत साजरा होत असलेला हा अखंड नामजप आणि गजर कीर्तनाचा या निमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार साधू संत यांचे प्रबोधन कीर्तनरूपी सेवा लाभणार आहे. या प्रसंगी या किर्तन महोत्सव सोहळ्यानिमित्ताने तसेच भक्तिमय आणि आनंददायी वातावरणात साजरा होत असलेल्या सप्ताह निमित्ताने येथील युवक,युवती, महिला तसेच ग्रामस्थ मंडळ चिल्हे यांच्या वतीने आध्यात्मिक परंपरेचा वारसा म्हणून धार्मिक तथा आध्यात्मिक तसेच काही ऐतिहासिक कलाकृती साकारकेल्याने असंख्ये भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे...
चैतन्य संप्रदायाची परंपरा लाभलेल्या तसेच थोर साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत तसेच कोकण वाशीयांचे श्रद्धास्थान परमपूज्य स्वानंद सुखनिवासी सद्गुरू वै. हभप अलिबागकर महाराज,गुरुवर्य गोपाल महाराज वाजे,धोंडूबाबा कोलाटकर यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या तसेच परमपूज्य पांडुरंग शात्री आठवले (दादा) आणि सद्गुरू मामासाहेब दांडेकर गुरुवर्य बाबामहाराज सातारकर, महंत नामदेव यांचे थोर प्रबोधन लाभलेल्या या खांब पंचक्रोशीत हभप नारायण दादा (अलिबागकर ) वाजे मठाधिपती पंढरपूर,हभप दत्तू महाराज कोलाटकर यांचे कुशल मार्गदर्शन तसेच हभप रायगड भूषण तथा विद्या वाचस्पती खांब पंचक्रोशीचे वैभव डॉ.मारुती महाराज कोलाटकर यांच्या नेतृत्वाने हा अखंड हरिनाम व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण, संत तुकाराम महाराज गाथा वरील भजन प्रवचन, हरिपाठ, किर्तन, आणि हरिजागर श्री क्षेत्र चिल्हे या ठिकाणी मोठ्या उत्साह वातावरणात संपन्न होत असून याची जय्यत तयारी चिल्हे गावातील युवक,युवती,महिला व आदी ग्रामस्थ मंडळ करीत आहेत...
कोकण वाशीयांचे श्रद्धास्थान परमपूज्य स्वानंद सुखनिवासी सद्गुरू वै. हभप अलिबागकर महाराज,गुरुवर्य गोपाल महाराज वाजे,धोंडूबाबा कोलाटकर यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या तसेच परमपूज्य पांडुरंग शात्री आठवले (दादा) आणि सद्गुरू मामासाहेब दांडेकर गुरुवर्य बाबामहाराज सातारकर,भगवानगड येथील महंत न्यायाचार्य हभप डॉ.नामदेव महाराज शास्त्री, वेदांतचार्य महंत विवेकानंद शास्त्री यांचे थोर प्रबोधन लाभलेल्या या खांब पंचक्रोशीत हभप नारायण दादा (अलिबागकर ) वाजे मठाधिपती पंढरपूर,हभप दत्तू महाराज कोलाटकर यांचे कुशल मार्गदर्शन तसेच हभप रायगड भूषण तथा विद्या वाचस्पती खांब पंचक्रोशीचे वैभव डॉ.मारुती महाराज कोलाटकर यांच्या नेतृत्वाने हा अखंड हरिनाम व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण श्री क्षेत्र चिल्हे या ठिकाणी मोठ्या उत्साह वातावरणात संपन्न होत असून याची जय्यत तयारी चिल्हे गावातील युवक, युवती, महिला व आदी ग्रामस्थ मंडळ यांनी केल्याने जणू या पंचक्रोशीत धाकटी पंढरी अवतरली आहे. येणाऱ्या साधू संतांच्या स्वागतासाठी गावात कणा रांगोळी पुलांची सजावट, घरोघरी आनंदाची गुढी उभारण्यात आली असून मंदिर कलश आणि परिसर रोषणाईंनी उजळून निघाला आहे...
सदरच्या संपन्न होणाऱ्या या सप्ताह प्रसंगी हभप नारायण दादा अलिबागकर वाजे, हभप भरत महाराज अलिबागकर वाजे पंढरपूर, हभप रामदास महाराज टोंगले,हभप रामदास महाराज पाटील खानाव, हभप तुकाराम महाराज शिंदे,हभप विनायक महाराज कांबे कांबे,हभप विशाल महाराज खोले मुक्ताईनगर, हभप जगन्नाथ महाराज पाटील शहापूर,तर सांगता समारोह काल्याचे किर्तन हभप डॉ मारुती महाराज कोलाटकर अशा थोर संतांचे प्रबोधन मार्गदर्शन या किर्तन महोत्सवातून लाभणार आहे...
येथील युवकांनी एकत्रित येत या ठिकाणी श्री संत ज्ञानोबाराय संत तुकोबाराय शिव श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने तसेच संत परंपरा जोपासत या ठिकाणी धार्मिक तथा आध्यात्मिक आणि ऐतिहासिक कलाकृती साकारल्या आहेत यात पौराणीक संत काळातील झोपडी, ऐतिहासिक तोरणा किल्ला, बाजी प्रभूंनी खिंड लढवली ते पावन खिंड असा देखावा या निमित्ताने साकारून एक हिंदू परंपरेतील धार्मिक आध्यात्मिक आणि ऐतिहासिक संदेश दिला आहे...
संत परंपरेतील ऐतिहासिक, धार्मिक तथा अध्यात्मिक,सामाजिक अशा सर्व बाजूने तरुणाईला बोध देणारे असे आकर्षित देखावनातरी सेवेचा सर्व संप्रदाय भाविकांनी श्रावणाचा लाभ घ्यावा असे आवाहन मौजे चिल्हे ग्रामस्थ आणि खांब पंचक्रोशी यांनी केले आहे...

