महाराष्ट्र वेदभुमी

संतांच्या पावलावर पाऊल टाकून चालणे हीच खरी संत सेवा :- हभप नारायणदादा वाजे.

 



कोलाड (श्याम लोखंडे) श्रद्धेचा ठेवा जिथे असेल तिथेच संत सेवा घडेल आमची सेवा देवा करिता आहे, गुरूंचा आणि आई वडिलांचा आशीर्वाद ज्याच्या पाठीवर असतो त्याचे सार्थ झाल्याशिवाय राहणार नाही.सद्गुरू वै. अलिबागकर बाबांनी दिलेला रामकृष्ण हरी मंत्राचा नामजप केला पाहिजे पालघर नंतर खांब पंचक्रोशीत सद्गुरू अलिबागकर बाबा,गोपाल बाबा,धोंडू बाबांनी या पंचक्रोशीत अखंड नामस्मरण सप्ताह सुरू करत इवलेसे रोप लावले आणि त्याचे वटवृक्षात रूपांतर झाल्याचे पहावयास मिळत मिळत असल्याने खऱ्या अर्थाने या पंचक्रोशीत नागरिक संतांच्या पावलावर पाऊल टाकत चालत आहेत त्यामुळे त्यांचा हातूनच खरी संत सेवा घडत असल्याचे मार्गदर्शन हभप नारायणदादा अलिबागकर वाजे मठाधिपती पंढरपूर यांनी चिल्हे येथे किर्तन सेवेतून केले...

वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेल्या श्री संत सेवा मंडळ खांब पंचक्रोशीचा ६९ वे अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र चिल्हे येथे सोमवारी ९ मार्च रोजी प्रारंभ झाला असून या सप्ताह प्रसंगी श्री संत एकनाथ महाराज यांची नाथ षष्ठी आणि त्या निमित्ताने प्रसंगी कीर्तन सेवेतून हभप नारायण दादा यांनी आध्यात्मिक विचारांवर तसेच संत परंपरा त्याच बरोबर महाराष्ट्राला लाभलेला शिवरायांचा ऐतिहासिक वारसा यावर सुंदर विवेचन केले...

सकाळी आठ वाजता सप्ताहाची सुरुवात सुधीर महाराज लोखंडे यांच्या शुभहस्ते कलश पूजन, ध्वज पूजन आणि सद्गुरू अलिबागकर महाराज, गुरुवर्य गोपाल बाबा वाजे, गुरुवर्य धोंडू बाबा कोलाटकर यांच्या अधिष्ठान स्थापनेने तसेच धार्मिक तथा आध्यात्मिक मंत्र जपाने व अभंग वाणीने करण्यात आली.यावळी गुरुवर्य हभप नारायणदादा अलिबागकर वाजे पंढरपूर, दत्तू महाराज कोलाटकर,डॉ. मारुती महाराज कोलाटकर,भरत महाराज अलिबागकर वाजे, मदन महाराज कोलाटकर,पंचक्रोशीचे अध्यक्ष कृष्णा महाराज जाधव, प्रकाश महाराज थिटे,रामशास्त्री नागावकर, कृष्णकांत धनवी, सहदेव महाडिक, धोंडू कचरे, पांडुरंग गोसावी, रघुनाथ कोस्तेकर , सह श्री संत सेवा मंडळ पंचक्रोशी खांब चे सर्व पदाधिकारी आदी चिल्हे ग्रामस्थ युवक युवती व महिला मंडळ तथा वारकरी संप्रदाय भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते...

प्रसंगी सप्ताहात श्री संत ज्ञानेश्वर गाथेवरील सामुदायिक पारायण पठाण्यासाठी या ठिकाणी जवळपास एकशे साठ ते एकशे सत्तर हून अधिक वाचक पठाण्यासाठी बसले असून या धार्मिक तथा आध्यात्मिक कार्यक्रमाचे औचित्य साधून स्व. लक्ष्मण रावजी महाडिक यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र अनिल आणि सून स्वरा महाडिक या दांपत्यकडून उपस्थित ज्ञानेश्वरी पारायणास पठण करणाऱ्या भाविकांना श्री संत ज्ञानेश्वरी गाथा हभप डॉ. मारुती महाराज कोलाटकर यांच्या शुभहस्ते देण्यात आल्या. तर भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झालेल्या अखंड हरिनाम सप्ताह प्रसंगी गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या आध्यात्मिक कार्यक्रमात सकाळी काकडा आरती, श्री संत ज्ञानेश्वरी ग्रंथ राज पारायण, श्री संत तुकाराम महाराज गाथा वरीवर भजन, प्रवचन सामुदायिक हरिपाठ,किर्तन वीणा पहारा,हरी जागर तसेच दुपारी महाप्रसाद, सायंकाळी महाप्रसाद असे धार्मिक तथा आध्यात्मिक कार्यक्रम संपन्न करण्यासाठी चिल्हे ग्रामस्थ, युवक, युवती महिला महिला मंडळ अथक परिश्रम घेत आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post