महाराष्ट्र वेदभुमी

रायगडचे 'माणुसकीचे रत्न' प्रमोद शेठ म्हसकर यांचा ठाण्यात गौरव!

(पुगांव रोहा - नंदकुमार कळमकर): 'द्रोणाचार्य संस्थे'च्या वार्षिक सोहळ्यात 'द ओमेगा लिगसी' पुरस्काराने सन्मानित; हजारो विद्यार्थ्यांसमोर मांडला दातृत्वाचा आदर्श आपल्या कर्तृत्वाने मुंबई ते दुबईपर्यंत व्यवसायाचा विस्तार करणारे आणि दातृत्वाने रायगडच्या कानाकोपऱ्यात 'माणसातला देवमाणूस' म्हणून ओळखले जाणारे आदरणीय प्रमोद शेठ अनंतराव म्हसकर यांना ठाण्यातील नामांकित द्रोणाचार्य शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने "The Omega Legacy : Excellence in Sports, Health & Social Welfare Award" देऊन गौरवण्यात आले... कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात संपन्न झालेल्या या सोहळ्यात प्रमोद म्हसकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला...

वंचित मुलांच्या शिक्षणाला द्रोणाचार्य संस्थेचा आधार

उपेक्षित समाज व शिक्षणापासून वंचित असलेल्या तळागाळातील ३००० मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे पवित्र कार्य ही संस्था अविरतपणे करत आहे, या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ मिळावे आणि त्यांच्यासमोर अनेक आदर्श व्यक्तिमत्त्व असावे, या मुख्य हेतूने संस्थेचे संस्थापक श्री. विनोद पाटील सर यांच्या संकल्पनेतून दरवर्षी या सोहळ्याचे आयोजन केले जाते. जिथे राज्यातील विशेष समाजसेवकांचा आदर व सन्मान केला जातो...

प्रमोद शेठ म्हसकर यांनी केवळ व्यवसायच केला नाही, तर रायगड जिल्ह्यातील शेकडो युवा खेळाडूंना आर्थिक पाठबळ देऊन त्यांना 'आधारस्तंभ' म्हणून साथ दिली. अनेक जखमी खेळाडूंच्या शस्त्रक्रियेचा खर्च उचलून त्यांनी आपली क्रीडा क्षेत्राबद्दलची आत्मीयता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे... आरोग्य क्षेत्रातही दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च करून हजारो गरिबांच्या आयुष्यात त्यांनी आशेचा किरण निर्माण केला आहे...

"हा सन्मान माझ्या मातीतील माणसांचा"

पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना प्रमोद शेठ म्हसकर भावूक झाले. ते म्हणाले, "आज या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत जे स्वप्न मी पाहतोय, तेच माझ्या कामाची खरी पावती आहे... द्रोणाचार्य संस्थेसारखे कार्य करणाऱ्या संस्थांसोबत उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे..."

यावेळी व्यासपीठावर विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. रोहा तालुक्यातील पुगावचे सुपुत्र असलेल्या प्रमोद दादांना हा पुरस्कार मिळाल्याची बातमी समजताच संपूर्ण रायगड जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..

Post a Comment

Previous Post Next Post