सोगाव - अब्दुल सोगावकर : सर्व सामान्य नागरिकांना सण, उत्सव साजरे करता यावे यासाठी नेहमीच काळजी घेणाऱ्या अलिबाग तालुक्यातील मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील मुस्लिम बांधवांना ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगाव तर्फे शनिवार दि .21 मार्च 2026 रोजी रमजान ईद निमित्त मिठाई, गुलाबपुष्प देत शुभेच्छा देण्यात आल्या...
यावेळी सोगाव, मुशेत व इतर गावातील मुस्लिम बांधवांना घरोघरी जाऊन वाटप करण्यासाठी मापगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विजय भगत, माजी उपसरपंच वसीम कुर, शिवसेना(शिंदे गट) आवास विभाग प्रमुख जगदीश सावंत, माजी सदस्य मजीद कुर, अजित घरत, गितेश करळकर, प्रभाकर मोहिते, विश्वास थळे, अलिबाग पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्या स्नेहा रुत, पूजा रेणुका वेदांत भगत, जागृती सावंत, श्रुती भगत, रमेश थळे, उत्तम राऊत, सामाजिक कार्यकर्ते मुद्स्सर कुर, इलीयास हाफिज, दत्तात्रेय राऊत, मंगेश मापगावकर, मंगेश उकरूळकर, मंगेश सुतार, मनोज काठे, तेजस काठे, सुमेश थळे, राकेश करळकर, कल्पेश राऊत, वेदांत भगत, जितेंद्र करंजुकर, संतोष रुत, स्वप्नील थळे, महेश सावंत, शफी वाकनिस, प्रमोद थळे, मयूर मोरे, संदेश करंजुकर आदी मापगाव पंचक्रोशीतील ग्रामविकास परिवर्तन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते...
फोटो लाईन : ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगाव तर्फे मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्ताने मिठाई व गुलाबपुष्प वाटप करताना मान्यवर सदस्य,
