सोगांव -अब्दुल सोगावकर : अलिबाग तालुक्यातील मुनवली येथे 'घाडी बंधू' पुरस्कृत 'चषक २०२६' भव्य च्या क्रिकेट स्पर्धा शनिवार दि. २१ व रविवार दि. २२ मार्च २०२६ असे २ दिवस आयोजित करण्यात आल्या होत्या... या स्पर्धेत जाखमाता संघ परहूरपाडाने बाजी मारत प्रथम क्रमांक ३० हजार रुपये व आकर्षक चषक पटकावला...
या क्रिकेट स्पर्धाचें उद्गाटन रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुनील थळे व मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अशोक नाईक यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आले...
या स्पर्धेत अंतिम सामना जाखमाता संघ परहूरपाडा व श्री गणेश संघ परहूरपाडा यांच्यामध्ये होऊन अटीतटीच्या लढतीत जाखमाता संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक ३० हजार रुपये व आकर्षक चषक पटकावला तर श्री गणेश संघ परहूरपाडा संघाने द्वितीय क्रमांक २० हजार रुपये व आकर्षक चषक पटकावला, तसेच श्री दत्तप्रसाद संघ बहिरोळे यांनी तृतीय क्रमांक १० हजार रुपये व आकर्षक चषक पटकावला...
स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाजचा मान श्री दत्तप्रसाद संघ बहिरोळे संघाचा वितेश कवळे याने पटकावला आणी उत्कृष्ट गोलंदाजचा मान म्हणून श्री गणेश परहूरपाडा संघातील साजन नाईक व नितेश नाईक यांनी पटकाविले, त्यांना पुरस्कार विभागून देण्यात आले... तसेच उत्कृष्ट मालिकावीर म्हणून जाखमाता संघ परहूरपाडा संघाचा राज गुंजाळ याने पटकाविले... यासर्वाना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक परितोषिके व चषक देऊन गौरविण्यात आले... प्रत्येक सामन्यात उत्कृष्ट मालिकावीर ठरणाऱ्या खेळाडूला मुनवली येथील अल्पेश मल्हार व अतिश मल्हार यांच्या तर्फे आकर्षक असे टी शर्ट देण्यात आले...
स्पर्धाकाळात खेळाडू आणि आयोजकांना प्रोत्साहन व शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, रायगड जिल्हा कॉंग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकुर, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य काका ठाकुर, अलिबाग पंचायत समितीचे माजी सदस्य राजनभाई नार्वेकर, प्रसन्न सुर्वे, अभिजित राणे, महाराष्ट्र पोलीस अधिकारी दीक्षिता स्वप्नील भेलेकर, पनवेल न्यायालयाच्या सरकारी वकील ऍड. प्रतीक्षा वारंगे(वडे), रायगड जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक उपाध्यक्ष लाईक कप्तान, संजय शिंदे, विवेक जोशी, बहिरोळे पोलीस पाटील प्रफुल्ल थळे, राजेंद्र घरत, सूचित थळे, हेमंत नेमन, अक्षय जाधव यांनी उपस्थिती लावली असता आलेल्या सर्व मान्यवरांचा विशेष सत्कार सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी केले... याप्रसंगी उपस्थित राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत स्पर्धेत उत्साह भरला...
बक्षीस वितरण समारंभ रायगड जिल्हा कॉंग्रेस उपाध्यक्ष सुनिल आप्पा थळे व मापगांव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अशोक नाईक यांच्याहस्ते करण्यात आले, यावेळी व्यासपीठावर अनिल जाधव, माजी तंटामुक्त उपाध्यक्ष विवेक जोशी, राजेंद्र घरत, हेमंत नेमन, युवा नेता सूचित थळे, श्री. गणेश मित्र मंडळ मुनवली अध्यक्ष संतोष बांद्रे, ज्येष्ठ नागरिक गोविंद अनमाने, दिलीप मोंढे, महेश नागावकर, रुपेश अनमाने, दयाराम म्हात्रे, सुधाकर ठकरूळ, सुरेश हाके, बाळाराम थळे, प्रणिता अनमाने, सुलोचना मोंढे, अशोक मसूरकर, किशोर मोंढे, मापगांव ग्रा.प.माजी सदस्या सानिका घाडी, अरविंद मसुरकर, घाडी बंधू, मधुकर सूद, संगिता मल्हार, गंगाराम ठकरूळ, वामन ठकरूळ, आत्माराम पंडम, शैलेश तिर्लोटकर सर यांच्यासह मुनवली महिला मंडळ, सचिन घाडी मित्रमंडळ व मुनवली ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते...
स्पर्धेत सूत्रसंचलन सतिश पाटील यांनी केले तर समालोचक नदीम वाकनीस, यश मापगावकर, निखिल पडते, संकेश ढोले, इमरान मुखरी यांनी उत्तमरित्या केले...
स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सचिन घाडी मित्रमंडळ मुनवली, श्री गणेश मित्रमंडळ मुनवली, महिला मंडळ मुनवली व मुनवली ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.
फोटो लाईन -पहिल्या चित्रात - मुनवली येथे 'घाडी बंधू चषक 2026' क्रिकेट स्पर्धेवेळी उपस्थित महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्वागत करताना सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी व उपस्थित इतर मान्यवर,
दुसऱ्या चित्रात - मुनवली येथील क्रिकेट स्पर्धेत जाखमाता परहूरपाडा संघाला प्रथम क्रमांकाचे परितोषिक देताना रायगड जिल्हा कॉंग्रेस उपाध्यक्ष सुनिल थळे व इतर उपस्थित मान्यवर,
