महाराष्ट्र वेदभुमी

ओढ आईच्या भेटीची...भक्त निघाला भेटीला, मानपान वर्षाचा देवाला.. पालख्या एकविरा गडाकडे मार्गस्थ.

रोहा प्रतिनिधी (नंदेश गायकर): दरवर्षीप्रमाणे चातकासारखी आपल्या आईच्या पालखी सोहळ्याची वाट पाहणारा एकविरा भक्त आनंदात आपल्या आईची भेट घ्यायला निघालाय.... जन्माला येऊन एकदा तरी पायी पदयात्रा करून आपल्या देवाला भेटावे अशी आशा बाळगणारा जीव.... आज आपल्या एकविरा आईच्या कार्ला  डोंगराला भरणाऱ्या पालखी सोहळ्याला निघालाय... रोहा तालुक्यातील मौजे कोकबन, खारापटी, रोठखुर्द, झोळांबे, आणि पहिल्यांदाच काढण्यात आलेल्या नीडी गावच्या एकवीरा देवीच्या पालख्या कार्ला गडाकडे मार्गस्थ झाल्या आहेत...

      मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या योग्य नियोजन आणि शिस्तबद्ध पद्धतीने पालखीचे आयोजन केले जाते... पालखीत सहभागी प्रत्येक एकविरा भक्त यांच्या जेवणाची खाण पानाची योग्य काळजी घेतली जाते... त्यांच्या वस्तीला राहण्याचा प्रयोजन योग्य पद्धतीने मंडळ हाताळते...  या पालखी नियोजनाची मुख्य जबाबदारी अध्यक्षावर असते... गावदेवी आणि गावच्या मुख्य वेसीची भेट घेऊन पालखी गावातून काढली जाते...

    यंदा हा एकविरा देवीचा पालखी सोहळा तारीख 25मार्च2026 रोजी होत असून यावेळी लाखो भाविक आईच्या भेटीला दाखल होणार असल्याचे दिसून येत आहे...स्वर्गसुखाचा आनंद जर घ्यायचा असेल तर आपल्या आईच्या कार्ला डोंगराला एकदा भेट दिलीच पाहिजे... काय तो डोंगराचा थाट आणि आणि तोच जल्लोष अनुभवायला प्रत्येक भक्त आसुसलेला असतो... आईच्या कार्ला डोंगराची ती गार हवा आणि सोहळ्याचा नजारा पाहून मन पुन्हा पुन्हा तिकडे धावते... हे सत्य आहे... आगरी कोळ्यांची कुलस्वामिनी म्हणून प्रचलित असलेल्या श्री आई एकवीरा देवीच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी मोठी असते... कार्ला गडावर पालखी सोहळ्याच्या दिवशी सकाळी आईची मानाची पालखी पूर्ण पोलिस बंदोबस्तात काढली जाते... लाखो भाविक आईच्या पालखीला मानाचा खांदा लावायला हजर असतात... आणि त्याच रात्री आईचा तेलवणाचा कार्यक्रम होतो आणि अशा तऱ्हेने पालखी सोहळ्याची सांगता होते...

Post a Comment

Previous Post Next Post