संवेदनशील क्षेत्र असल्याने वन विभागाचे मुख्यालय स्थापन करा
माजी मंत्री राजेंद्र मुळक यांची देवलापार येथील आंदोलनस्थळी भेट
रामटेक:- तालुक्यातील देवलापार येथे सुरू असलेल्या मानव-वन्यजीव संघर्षविरोधातील सुरू असलेल्या आंदोलनाच्या सहावा दिवस सुरू असून माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी आंदोलकांची भेट घेऊन संवाद साधला. तालुक्यातील गेल्या काही वर्षात मानव-वन्यजीव संघर्ष टोकाला गेला आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये ग्रामीण भागातील लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झालेआहे. विशेषतः शेतात काम करणारे लोकं आणि गुराखी हे यावाघांच्याहल्ल्यात बळी पडत असल्याचेचित्र आहे. ते म्हणाले कि जंगलात चांगल्या प्रकारचे ग्रॉस लँड (कुरण) लावणे गरजेचे आहे. त्यामुळे शाकाहारी प्राण्याला जंगलात चारा मिळेल व प्राणी बाहेर निघणार नाही. शाकाहारी प्राण्यांना जंगलातच चारा उपलब्ध झाल्यास ते बाहेर येणार नाहीत व त्यावर अवलंबून असलेले वाघ व इतर मांसाहारी प्राणीही मानवी वस्तीकडे येण्याचे प्रमाण कमी होईल. मुळक यांनी रामटेक तालुक्यात घटनांच्या पार्श्वभूमीवर वनविभागाचे स्वतंत्र मुख्यालय स्थापन करण्याची मागणी केली. सध्या प्रत्येक घटनेची माहिती जिल्हा स्तरावर पाठवावी लागत असल्याने स्थानिक अधिकाऱ्यांवर ताण येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जंगलालगत उभारण्यात येणाऱ्या संरक्षण भिंती दर्जेदार असाव्यात, केवळ औपचारिक नसाव्यात, अशी भूमिका त्यांनी मांडली. आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन राजेंद्र मुळक यांना सादर केले. वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. यावेळी जिल्हा परीषदेच्या माजी सदस्या शांता कुमरे, हरीष उईके, दुर्गावती सरियाम, पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र कुमरे, विजय कोकोडे, धर्मराज कोकोडे, मोतीराम खंडाते, मुकेश पेंदाम, सरपंच सरला खंडाते, कैलास निघोट, किरण सलामे, रमेश कुमरे, आनंद वाडिवे, गजानन ढोरे, हरीप्रसाद गुप्ता, संदीप ईनवाते, मोईन पठाण, माया कुमरे व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते...
