मुंबई प्रतिनिधी :(सतिश पाटील): भांडूप पोलीस ठाण्याच्या हद्दीत,'एस' विभाग कपड्याच्या पाच व एक ज्युस सेंटर अशा सहा दुकानांना भीषण आग लागली...भांडुप रेल्वे स्टेशन पश्चिम ड्रीम मॉल शेजारी दुकान लाईन आहे..
कोणतीही जीवीत हानी झाली नाही असा अंदाज आहे पण दुकाने जवळ जवळ बेचिराग झाली.. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल व भांडुप पोलीस हजर झाले आणि आग आटोक्यात आणण्याचा शर्थीने प्रयत्न चालू केले... आग का लागली याचा प्राथमिक तपास भांडुप पोलीस ठाणे अधिकारी, अग्निशमन दल व महाराष्ट्र वीज मंडळ करीत आहेत अशी माहिती मिळते.. आग लावल्यावर सर्व दुकानदार आपले जीव व सामान हलवण्यात व्यस्त होते... कदाचित इलेट्रीक शॉर्टसर्किट लागली असावी असा अंदाज आहे... बर्याच माध्यमातून मोबाईल दुकानात आग लागली अशी बातमी व विडिओ व्हायरल होत आहे तरीही घटना स्थळी कपडे विक्रीची दुकाने आहेत... आग भडकण्याचे कारण दुकानाच्या छतावर पुठ्ठे व प्लास्टिक, यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये...
