प्रतिनिधी सचिन चौरसिया
रामटेक :- प्रलंबित व दावादाखल पूर्व प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत २१५ प्रकरणांवर कार्यवाही झाली. सर्व प्रकरणांमध्ये तडजोड करून ८ लाख ७७ हजार ६३० रुपयांचा निपटारा करण्यात आला. अध्यक्ष एस. एम. सरोदे दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर रामटेक यांनी दिली. तर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर रामटेक यांच्या अध्यक्षतेत दोन पॅनल मध्ये कामकाज करण्यात आले. जिल्हा विधी सेवा समिती नागपूर यांच्या आदेशाने जिल्ह्यात शनिवार (दि.१४) मार्च रोजी नागपूर जिल्हा व सर्व तालुका नायालयात महा लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आणि वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. राष्ट्रीय महा लोकअदालतीमध्ये नेमलेल्या पॅनेल समोर दिवाणी व फौजदारी, (१३८) एन.आय अँक्ट, बैंक पतंसस्थाचे दाखल पुर्व प्रकरणे तसेच ग्रामपंचायतीचे घर व पाणी, वीज बील करांची १५०९ प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी दिवानी चे ७ प्रकरणे व फौजदारी ९७ प्रकरणे बँकेतील २ दाखल पूर्व प्रकरणे तसेच घर टॅक्स पाणी बिल १०९ प्रकरणे असे एकूण २१५ प्रकरणातून एकूण ८ लक्ष ७७ हजार ६३० रुपयाची तडजोड करून निपटारा करण्यात आला. सदर लोकअदालीत रामटेक तालुका विधी सेवा समितीचे अँड. एस. एम. सरोदे दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर, तसेच ए. ए. शिरवळकर, डी. सी. वोराणी २ रे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, रामटेक उपस्थीत होते. पॅनेल वर पॅनल मेंबर म्हणून अँड. सी. जी. मेश्राम व अँड. पी. के. महाजन यांनी कामकाज बघीतले. तसेच लोकअदालत यशस्वी करण्याकरीता तालुका बार असोसिएशन रामटेक आणि सर्व न्यायालीन कर्मचारी, शिपाई, स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले...
