महाराष्ट्र वेदभुमी

चाणजे पंचायत समिती गणातून अक्षय म्हात्रे विजयी होणार.

 


नागरिकांमध्ये चर्चा.

स्वच्छ, चारित्र्य संपन्न व उत्तम नेतृत्वामूळे निवडणुकीत मारणार बाजी.

दि ५(विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यात चाणजे पंचायत समिती शिवसेना उमेदवार अक्षय म्हात्रे (निशाणी धनुष्यबाण)हे निवडणूक लढवीत आहेत... अक्षय म्हात्रे हे स्वच्छ, चारित्र्य संपन्न उमेदवार आहेत व उत्तम नेतृत्वामूळे  ते निवडणुकीत बाजी मारणार असल्याची चर्चा सर्वत्र सूरू आहे... चाणजे पंचायत समिती गणाचे उमेदवार अक्षय म्हात्रे हे उच्चशिक्षित व सुसंस्कृत उमेदवार आहेत शिवसेना (निशाणी - धनुष्यबाण) पक्षाच्या वतीने ते चाणजे पंचायत समितीची उमेदवारी लढवत आहेत... अक्षय म्हात्रे यांचे आई-वडिलांनी समाजात अनेक चांगले काम केले आहेत... कोणताही स्वार्थ न बाळगता गोर गरीब, वृद्ध, विधवा, अपंग, अविवाहित अनाथांना मदत केली आहे... विविध शासकीय सेवा योजनाचा लाभ मिळवून दिला आहे, धोबीघाट बांधले, अक्षय म्हात्रे हे निवडून आल्यानंतर प्रकल्पबाधीत शेतकरी व मच्छिमार बांधवांना मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार, पाणी वीज रस्ते या मूलभूत सुविधा जनतेला मिळवून देणार... रोजगाराचा प्रश्न मार्गी लावणार... २४ तास जनतेसाठी कार्यरत राहणार असे अक्षय म्हात्रे यांनी सांगितले... कोणतेही मोठे पद नसतानाही अनेक विकास कामे अक्षय म्हात्रे यांनी केली आहेत... कोंढरीपाडा डिपी ते कासवले रस्त्याला विजेची व्यवस्था केली आहे... हनुमान मंदिर कोंढरी पाडा ते  कोंढरी पाडा डिपी या ठिकाणी स्ट्रीट लाईट तसेच बापदेवपाडा ते कासवलेपाडा बंदर किनारी रस्त्याला लाईट बसण्यासाठी पाठपुरावा, प्रयत्न केले... आणि लवकरच ते काम पूर्णत्वास नेणार... अनेक रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून दिली... असे अनेक विकासकामे करून अक्षय म्हात्रे यांनी जनतेचे प्रश्न मार्गी लावली आहेत... उत्तम कार्य केल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविले आहे... अशा उमेदवाराला जनता नक्कीच निवडून देईल अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे... नाक्या नाक्यावर सर्वत्र अक्षय म्हात्रे यांच्याच विजयाची चर्चा सुरु आहे ...

Post a Comment

Previous Post Next Post