पत्रकार कैलासराजे घरत : (खारपाडा पेण) : राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार कैलासराजे घरत यांच्यातर्फे बालगंगा विद्यामंदिर चुनाभट्टी, जिते येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एस.एस.सी.परीक्षा विदयार्थी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते... युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष पत्रकार कैलासराजे कमलाकर घरत अनेक सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवित असतात... आपल्या प्रास्ताविकात सामाजिक कार्यकर्ते पत्रकार कैलासराजे घरत म्हणाले ज्या शाळेत शिकून आपण मोठे झालो त्या शाळेचे शिक्षकांचे माझ्यावर ऋण आहेत... सामाजिक भावनेतून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी... ग्रामीण भागातील विद्यार्थी चांगले गुण मिळवून पुढे जावेत... यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत... विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी आमच्या परीने जेवढे उपक्रम राबविता येतील ते ते आम्ही नक्कीच राबविण्याचा प्रयत्न करू...
इयत्ता १० वीच्या परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना पेपर कसा लिहावा, अभ्यास कसा करावा, लेखन साहित्य, परीक्षा काळात कोणती काळजी घ्यावी, कमी वेळेत विद्यार्थी चांगल्या गुणांनी कसे उत्तीर्ण होऊ शकतात याचे मार्गदर्शन करून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या... या मार्गदर्शन शिबिराचे मार्गदर्शक राजेश रसाळ सर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी उपयुक्त असे अनमोल मार्गदर्शन केले... त्याचा १०वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत नक्कीच फायदा होईल आणि ते परीक्षेत भरघोस गुणांनी उत्तीर्ण होऊन प्राविण्य मिळवतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला... बालगंगा विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ.स्नेहल संजय वर्तक मॅडम, मेहतर मॅडम, इतर शिक्षक वृंद, विद्यार्थी मित्रांचे सहकार्य लाभले... मेहतर मॅडमने सर्वांचे आभार मानून ह्या शिबिराची सांगता करण्यात आली... जिते ग्रामस्थ आणि पालक वर्गाकडून या कार्यक्रमाचे कौतुक करण्यात आले...
