मुंबई प्रतिनीधी : (सतिश पाटील): मंगळवार दि.०३ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री गांवदेव-गांवदेवी आई मंदिराचा नववा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता... यामध्ये खिडकाळी गावातील महिलांचा सिंहाचा वाटा होता... जवळ जवळ २१ बचत गट मधील १६७ महिलांचा सहभाग होता... मंदिराची सजावट, मंदिराबाहेरील मंडप, स्टेज, विजेची रोशनाई, भोजनालय व्यवस्था अशा विविध विभागात गावातील तरूण, प्रौढ, बालक आणि महिला सेवा करण्यासाठी कटिबध्द होते...
गांवदेवी मंदिराच्या प्रांगणामध्ये सौ.दक्षता रविंद्र पाटील आणि सौ.किर्ती राजन पाटील यांनी अर्धनारी नटेश्वरची सुंदर आणि आकर्षक रांगीळी प्रतिकृती साकारलेली होती... सदर प्रतिकृती सर्वांचे लक्ष केन्द्र करीत होती...
सकाळपासून रात्रीपर्यत कार्यक्रमांची उत्कृष्ट आखणी केली होती.सकाळी ७ ते सायं.४ वाजेपर्यंत अभिषेक व आरती,पालखी मिरवणूक, बुध्देश्वर मंदिर व गांवदेवी मंदिरात श्री सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली... सायं.४ ते ६ श्री खिडकाळेश्वर महिला मंडळ यांचा हरिपाठ होता... सायं.७ ते ९ वा.ह.भ.प.सौ.प्रितीताई करण पाटील (भिवंडी) यांची सुश्राव्य किर्तनसेवा झाली... त्यानंतर मान्यवर व दानशूरांचे स्वागत सन्मान करण्यात आले...
कार्यक्रमाचे आकर्षण ठरले ते म्हणजे मंदिरावर केलेल्या फटाक्यांची आतीषभाजी.!उपस्थितांनी सदर आकर्षक दृश्य आपल्या जवळील मोबाईलमध्ये संग्रहीत केले... दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा खिडकाळी मधील विशेष योगदान असलेल्या ३ रत्नांना 'खिडकाळी गौरव' म्हणून आकर्षक सन्मानचिन्ह,शॉल व श्रीफळ देऊन सन्मानीत करण्यात आले... १) कु.ओमकार विनोद ठाकुर (दहावी-गुण-९५%),२) कु.नाजुका अशोक म्हात्रे (दहावी-९२%),३) कु.आतिष निलेश घरत (कुस्तीमध्ये जिह्यात प्रथम). अशाप्रकारे सन्मानांची परंपरा यावर्षीही यशस्वीपणे पार पडली...
ठाणे महानगरपालिका वार्ड क्र २९ मधील नवनिर्वाचित नगरसेवक १) श्री.बाबाजी पाटील साहेब, २) सौ.अर्चना निलेश पाटील आणि ३) सौ.वेदीका साहिल पाटील यांनीही सदिच्छा भेट देऊन ग्रामस्थांचे कौतुक व शुभेच्छा दिल्या... तसेच पंचक्रोषितील राजकारणी, आध्यात्मिक, उद्योगपती, समाजसेवक या सर्व मान्यवरांनी सुध्दा दर्शनाचा लाभ घेतला... जेष्ठ पत्रकार श्री.सतीश पाटील यांनीही सदिच्छा भेट दिली... त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला... यावर्षीही विशेष आकर्षण म्हणून दर्शनरांगेत महिलांसाठी 'लकी-ड्रॉ' बॉक्स ठेवण्यात आला होता... यामध्ये जवळ जवळ २०० हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला होता... रात्री १०:३० नंतर लोकमनोजनार्थ विशेष कार्यक्रम हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे यांचा 'याल तर हसाल' हा धमाल विनोदी कार्यक्रम आयोजित केला होता... अडीच तास त्यांनी संजीवन विनोदी फटाक्यांची आतीषभाजी केली आणि सर्वांची हसवून रक्ताभिसरण क्रिया सुरळीत केली... कार्यक्रमाला सुरूवात करण्याआगोदर गावातील उत्कृष्ट ढोलकी वादक श्री.शालीक कमळू पाटील यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून मंचाला मानवंदना केली... कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाचा भार श्री.सतीश पाटील यांनी उत्कृष्टपणे पेळला...
सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी श्री.संजय पाटील,श्री.रूपेश पाटील,श्री.अनिल म्हात्रे,श्री.राजेश पाटील,श्री.धनेश ठाकुर,श्री.राजन पाटील,सौ.शुभांगी ठाकुर,श्री.नवनाथ ठाकुर, श्री.जगदीश पाटील आणि श्री.चंद्रकांत पाटील यांनी खूपच मेहनत घेतली... गेली ९ वर्ष कृतज्ञभवानुबंध गृप हा सदर कार्यक्रमाचे नियोजन करत असतो... "जर कार्यक्रम यशस्वी करायचा असेल तर उत्कृष्ट नियोजन करायला हवे"...असे कवी नवनाथ ठाकुर यांनी सांगितले... म्हणूनच उत्कृष्ट नियोजनासाठी 'कृतज्ञभावानुबंध गृप' सदैव कटिबध्द असतो... सदर कार्यक्रमासाठी कृतज्ञभावानुबंध गृपसोबत आई गांवदेवी चॕरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष-श्री.यशवंत पाटील आणि इतर सभासदही सक्रिय होते... पंचक्रोषितील हजारो भाविकांनी श्री गांवदेव-गांवदेवी आई मंदिराच्या ९व्या वर्धापन दिन सोहळ्याचा आनंद घेतला...
