नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
राजोल पाटील यांनी घेतली सहाय्यक आयुक्तांची भेट
मुंबई, दि. ५ प्रतिनिधी: (सतिश पाटील)
भांडुप पश्चिम येथील माता रमाबाई नगरला होणा-या पाण्याच्या पाईप लाईन मध्ये नाल्याचे पाणी जात असल्याने नागरीकांना दुषित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरीकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून पालिकेने नविन पाईप लाईन टाकण्याचे काम लवकर पुर्ण करावे, यासाठी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या प्रभाग क्रमांक ११४ च्या नवनिर्वाचित नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी ‘एस’ वार्डच्या सहाय्यक आयुक्त समरीन सय्यद यांची भेट घेऊन त्यांना या गंभीर समस्याची माहिती दिली...
मुंबई सारख्या ठिकाणी आजही नागरीकांना स्वच्छ पाणी पुरवठा होत नाही... हि लाजीरवाणी बाब असून कोट्यावधी रुपयांचा कर घेणा-या पालिकेला पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी वारंवार विनंत्या कराव्या लागत आहेत... तरीही पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याचे राजोल पाटील यांनी सांगितले...
भांडुप पश्चिम येथील माता रमाबाई भागात पाणी पुरवठा करणा-या पाईप लाईन्स सांडपाण्याच्या नाल्यातून जात आहे... त्यामुळे जीर्ण झालेल्या पाईप लाईन मध्ये सांडपाणी जात असल्याने नागरीकांना दुषित पाणीपुरवठा होत आहे... शिवाय या पाईप लाईन मुळे नाला तुंबत असल्याने दुषित पाणी नाल्याच्या बाहेर येत असल्याने या परिसरात दुर्गंधी पसरुन मच्छरांची पैदास( वाढ )होत आहे... त्यामुळे नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून या सर्व पाईप लाईन्सचे बदली करण्याचे काम लवकर पुर्ण करण्यात यावे, यासाठी प्रभाग क्रमांक ११४ च्या नगरसेविका राजोल संजय पाटील, माजी नगरसेवक रमेश कोरगावकर व शाखा प्रमुख राजेश कदम यांनी आज ‘एस’ वार्डच्या सहाय्यक आयुक्त समरीन सय्यद यांची भेट घेऊन त्यांना या समस्यांबाबत अवगत केले... यावेळी पाईप लाईन लवकर बदली करण्याचे आश्वासन सय्यद यांनी राजोल पाटील यांना दिले...
