शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी केले पक्षात स्वागत
सोगाव (अब्दुल सोगावकर) : रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच अलिबाग तालुक्यातील मापगावचे काँग्रेसचे माजी उपसरपंच वसीम कुर यांनी आपल्या समर्थकांसह बुधवारी (ता.४) शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला...
हा पक्षप्रवेश सोहळा अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, आवास रायगड जिल्हा परिषदेचे उमेदवार दिलीप उर्फ छोटमशेठ भोईर यांच्या उपस्थितीत सोगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच वसीम कुर, मुद्स्सर कुर, किफायत कुर तसेच चोरोंडे येथील श्याम परब, जगदीश मल्हार, केतन परब व इतर अनेक कार्यकर्ते यांनी पक्षप्रवेश केला. पक्षप्रवेश केलेल्या सर्वांचे आमदार महेंद्र दळवी यांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन शिवसेना पक्षात स्वागत केले...
या कार्यक्रमाला श्रीक्लासेस चोंढीचे संस्थापक संतोष राऊत सर, मापगाव शिवसेना (शिंदे गट) विभाग प्रमुख जगदीश सावंत, संजय हडकर, प्रभाकर मोहिते, किहीम ग्रामपंचायतीचे माजी सरपंच पप्या दळवी, बाबू कुर, इस्माईल कुर, गुलजार कुर, नजीर कुर, रहुफ कुर, उत्तम राऊत, मनोज काठे, मापगाव ग्रामपंचायत माजी सदस्या स्नेहा रुत, अजित घरत, प्रदीप दळवी, इलियास हाफिज, विजय सोनावणे, प्रकाश गुळेकर, स्वप्नील नारकर, सुमेश थळे, प्रमोद थळे, निसार पठाण, मोअज्जम पठाण, युनूस शेख, वजाहत कुर, सलमान कुर, हैदर कुर, माहिद कुर, सादिक कुर, अल्बार कुर, संतोष भगत, विलास पाटील, संदेश पाटील, साहिल शिरगावकर, साजिद, नवनीत कांबळे, आदेश कांबळे, नदीम शेख यांच्यासह वसीम कुर यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिघ्रे-मुरुड येथील शिवसेनेचे मुस्लिम समाजातील कार्यकर्ते व अनेक मान्यवर, पदाधिकारी तसेच सोगाव येथील सर्व समाजातील महिला व पुरुष कार्यकर्ते आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते...
आमदार महेंद्र दळवी यांनी मार्गदर्शन करताना सोगावचे माझ्यावर विशेष प्रेम असून माझ्या जडणघडणीत या सोगाव गावाने मला प्रत्येकवेळी मोलाची साथ दिली आहे. या पक्षप्रवेशामुळे शिवसेना (शिंदे गट) उमेदवार दिलीप भोईर व किहीम पंचायत समिती गणाच्या उमेदवार स्नेहा रुत यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे, त्यामुळे या सर्व जागा मागील निवडणुकीपेक्षा यावेळी छोटमशेठ चार पटीने निवडून येणार असल्याचे सांगितले...
वसीम कुर हे उमदे नेतृत्व असून, त्यांचे या भागात सर्व समाजासोबत वैयक्तिक हितसंबंध मोठ्या प्रमाणात चांगले असल्याने ते पुढील येणाऱ्या किहीम पंचायत समितीच्या गणातून निवडणुकीत उभे राहिल्यास सहज निवडून येतील, असा मला पूर्ण विश्वास वाटत असल्याचेही आमदार महेंद्र दळवी म्हणाले. आवास जिल्हा परिषदेचे उमेदवार दिलीप भोईर यांनी पक्षप्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात विशेष सन्मान राखला जाईल, असे सांगितले...
मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच वसीम कुर यांनी आम्ही आज केलेला पक्षप्रवेश आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यपद्धतीवर प्रेरित होऊन आपल्या भागात अधिकाधिक विकास करण्यासाठी केला असल्याचे सांगितले, तसेच रायगड जिल्हा परिषदेचे उमेदवार दिलीप भोईर यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून विजयी करणार असल्याचे शेवटी सांगितले...
