रोहा (नंदकुमार कळमकर): पातळगंगा औद्योगिक क्षेत्रात नामांकित असलेली इदेमित्सु लुब इंडिया प्रा. लिमिटेड कंपनी दरवर्षी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबवीत असते. यावर्षी २ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत जनजागृती दिवस म्हणून साजरा केला जातो... सामाजिक बांधिलकी जपत इदेमित्सु दरवर्षी डेपो कॉम्पेटिशन स्पॉट क्विझ वाहन फिटनेस चॅम्पियन्स दोन चाकी आणि ४चाकी, साफ धोक्याचे प्रशिक्षण आणि खबरदारी, अग्निशामक प्रशिक्षण, बचावात्मक ड्रायव्हिंग प्रशिक्षण, दृष्टी जागरूकता कार्यक्रम आणि नेत्रे तपासणी शिबिर, एच आय व्ही एड्स जागरूकता कार्यक्रम आणि एचआयव्ही चाचणी शिबीर आणि रस्ता सुरक्षा जागरूकता बाईक रॅली असे उपक्रम राबवून जनजागृती मोहीम करून एक वेगळा संदेश देत असते...
सदर बाईक रॅलीच्या इदेमित्सु कंपनीचे उपव्यवस्थापकीय संचालक श्री. अकिनोरी हारा सर यांनी बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवून बाईक रॅलीला प्रारंभ केला... नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमाबद्दल जनजागृती निर्माण होणे, अपघात टाळण्यासाठी हेल्मेट व शिटबेल्टचा वापर करणे, वेगावर नियंत्रण आणि वाहतुकीचे नियम वाहन चालवितांना पाळावे अशी जनजागृती करण्यात आली... कंपनी पासून ६ किलोमीटर अंतरावर पुन्हा त्याच मार्गी रॅलीची सांगता करण्यात आली या रॅलीमध्ये कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, सह अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कामगार,असे १४० दुचाकी स्वार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.. यावेळी रसायनी पोलीस स्टेशनचे विशेष सहकार्य लाभले...
ही रॅली यशस्विकरण्यासाठी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री.तोशियाकी नामिगोशी सर, उप व्यवस्थापिकीय संचालक श्री. अकिनोरी हारा सर, यांनी पाठींबा दिला... तसेच सुरक्षा विभागाचे प्रमुख आशुतोष पांडे सर, व्यवस्थापक ऑपरेशन दिपक येलकर, उप व्यवस्थापक स्वप्नीला आंबेकर मॅडम, प्रशासक विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक अनिल घेवारी, गोपाळ सुरवसे, भूपेश शेडगे, सर्वेश म्हात्रे, ऑपरेशन विभागाचे संजय पाटील, अनिकेत पाटील, सामान्य खरेदी विभागाचे गणेश देशमुख, तसेच रसायनी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर, उपनिरीक्षक प्रकाश माळी, मंगेश बाचकर अभिनव जैन उपस्थित होते... संजय बांगर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून रॅली यशस्विरित्या संपन्न केल्याबद्दल कंपनी कौतुक केले...
