महाराष्ट्र वेदभुमी

भूमिपुत्राला वाचवायचं असेल,जगवायचं असेल तर महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही:- ज्योतीताई ठाकरे


नऊ तारखेचा गुलाल  हा महाविकास आघाडीचाच असेल.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे ज्योतीताई ठाकरे यांचे आवाहन.

उरण दि ६(विठ्ठल ममताबादे): भूमिपुत्र जगला पाहिजे... भूमिपुत्र वाचला पाहिजे... तर एकच गोष्ट लक्षात ठेवा... महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही.भाजप हा भूमिपुत्रांचा, स्थानिकांचा अपमान करणारा पक्ष आहे... त्यांच्या बुडाला आग लावायची असेल तर मशाली शिवाय पर्याय नाही... असे रोखठोक विचार शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी व्यक्त केले... नवघर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्रेरणा कुणाल पाटील, भेंडखळ पंचायत गणाचे उमेदवार दीपक भोईर, नवघर गणाचे उमेदवार परेश ठाकूर यांच्या प्रचारार्थ प्रचार सभा गुरुवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता  भेंडखळ येथील विठ्ठल रखुमाईच्या  पटांगणात आयोजित केले होते... त्यावेळी ज्योतीताई ठाकरे बोलत होत्या... व्यासपीठावर माजी आमदार मनोहरशेठ भोईर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, नगराध्यक्षा भावना घाणेकर, सेनेचे नरेश राहळकर, शेकापचे चिटणीस रवी घरत, नरेश म्हात्रे, दीपक भोईर, बळीराम ठाकूर, यशवंत ठाकूर, मधुकर ठाकूर ,मनोहर पाटील, विजय ठाकूर, कुणाल पाटील, शितल ठाकूर, लक्ष्मण ठाकूर, सूर्यकांत ठाकूर, मधुकर भोईर, अमितदादा, अजित ठाकूर, सोनालीताई, शितलताई ,राकेश भोईर, सोनाली ठाकूर, सुरेश भोईर ,मच्छिंद्र घरत तसेच अन्य मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते... यापुढे बोलताना ज्योती ठाकरे यांनी भारताचे जनता संविधान प्रमाणे चालण्याचा आग्रह करते... माझ्या माहितीप्रमाणे राजिपची निवडणूक सात वर्ष रखडली होती. राज्यामध्ये अशा प्रकारच्या निवडणुकांची आणीबाणी कधीच आली नव्हती... भामटा जगला पाहिजे पार्टी आली... माहिती आहे ना तुम्हाला? असा खोचक प्रश्नही ठाकरे यांनी  केला... कारण पूर्वीची भाजपा राहिली नाही. ज्यावेळी अटलजी होते... सुषमा स्वराज होत्या... प्रमोदजी महाजन, मुंडे साहेब होते... त्यावेळची आम्हाला भाजप दिसत नाही... आम्हाला दिसते भामटा जगला पाहिजे पार्टी... जिकडे  कुठे काळे बेर आहे. ते शोधायचे त्याला आपल्याकडे आणायचे... आणल्यानंतर धुवायचे... मग त्याला पुन्हा सुशोभित करून मढवायचे एवढे काम करणारी ही पार्टी... बरं झालं सुप्रीम कोर्टाने आमच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाला दणका दिला... म्हणून जनसामान्यांचा आवाज अनेक वर्ष दबला होता... आम्हाला चिड होती... आम्हाला राग होता... आम्हाला संताप होता... आणि तोच आम्हाला बाहेर काढता येत नव्हता... कारण आम्हाला मत टाकण्याचा अधिकार सात वर्ष दिला नव्हता... तो आता सुप्रीम कोर्टाने आम्हाला दिला... म्हणून ही निवडणूक होत असल्याचे त्यांनी सांगितले... खरंतर मी इथे येण्याची दोन कारणे आहेत ...
 एकतर हा प्रचार या सगळ्या मंडळींचा... त्यांना निवडून द्या... हे आवाहन तुम्हाला करण्यासाठी मी आलो आहे...यावेळी भावनाताई घाणेकर यांच्याबद्दल बोलताना ज्योती ठाकरे यांनी भावनाताई या उरण नगर परिषदेमध्ये एक महिला प्रचंड तेजाने तळपत निवडून आली आहे... त्याबद्दल त्यांचे मला अभिनंदन करायचं आहे... कारण असे की भावनाताईंचा विजय हा भावनाताईंबरोबरच भावनाताईसह महाविकास आघाडीवर प्रेम करणाऱ्या आणि बालदीवरती नाखुश असणाऱ्या प्रत्येकाचा विजय होता... त्याला वाकवलं, झोपवलं याच्यात मी पडणार नाही... पण  त्याचे दिवस मात्र कमी राहिलेत... याची मात्र शंभर टक्के गॅरंटी मी तुम्हाला देऊन जाते... मुळात आमचे भूमिपुत्र... आगरी ,कोळी, कराडी समाजाचे या ठिकाणी एकत्र बसणारे... त्यांनी कधीच जातिभेद केला नाही... ही उरण माझी कर्मभूमी याचा मला अभिमान आहे... की हुतात्मांच्या कर्मभूमीत काम करण्याची संधी या ज्योती ठाकरेला काही वर्ष मिळाली आहे... इथे कोणीही कधी कोणाविषयी जातीभेद केला नाही... तो आम्हाला करायला लागला... त्याचे कारण असे की, ज्याला मते देऊन मोठा केला... तोच आमच्या डोक्यावरच्या टाळूवरचं लोणी खातोय... टाळूही शिल्लक ठेवत नाही... आणि असे जर कोणी करत असेल तर त्याला हद्दपार केल्याशिवाय उरणची जनता स्वस्थ बसणार नाही... कारण ही हुतात्म्यांची भूमी आहे... ही संपूर्ण समाजाला न्याय मिळवून देणारी ऐतिहासिक भूमी आहे... पहिल्या वेळेला चमत्कार केला... तो काय केला... कसा केला.. हे आपल्याला माहिती आहे... तो निवडून आला लोकांना वाटलं कामे होतील पण कामे झाली नाहीत... कोविडमध्ये आमदार मदत करील... परंतु आमदार पळून गेला... तो कुठे दिसलाच नाही... दिसला तो आमचा हा आमदार सातत्याने लोकांपर्यंत पोहोचणारा, लोकांपर्यंत भिडणारा, त्यांच्या न्यायाला मागणीला यश देणारा मनोहर शेठ भोईर... हे असे दुष्टचक्र मोडायचे असेल तर आपल्याला घटनेने जो एका मताचा बहुमूल्य अधिकार दिला आहे... तो बजावल्याशिवाय आता जनता स्वस्त बसणार नाही कारण जर हा अधिकार आपण प्रामाणिकपणे, निष्ठेने, न्यायाने योग्य माणसासाठी बजावला नाही... तर या वेळेला फक्त निवडणुका लांबवल्यात... भविष्यात त्या होतील की नाही याची पण आम्हाला खात्री राहणार नाही... म्हणून आम्हाला महाविकास आघाडीला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचे आहे... माणसा माणसामध्ये द्वेषभाव करायला सुरुवात सत्ताधाऱ्यांनी केली आहे... त्यांची चाल ओळखून त्यांना वेळीच ठेचता आले पाहिजे... म्हणून ही आजची प्रचार सभा आहे... महाविकास आघाडीचे उमेदवार शुद्ध चरित्राचे आहेत... मी जबाबदारीने बोलते... कधीही विकली न जाणारी सत्याच्या व सच्चाईच्या बरोबर राहणारी आणि तुमच्या लोकांचा विश्वास प्राप्त करून घेऊन, तुम्हाला त्यांचे फळद्रूप व्हावे असे हे आपले तीनही उमेदवार निवडून आले पाहिजेत... हिंदू टर्मिनल बरोबर अनेक कंपनीतील कामगारांचे काम काढून त्यांना कमी केले आहे... हे कितपत बरोबर आहे... ज्या भूमीत या कंपनी उभ्या राहिल्यात... त्या कंपन्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी सत्ताधाऱ्यानी भूमिपुत्रांचा कडेलोट करण्याचे काम सुरू केलेले आहे... भूमिपुत्रांवर अन्याय होत आहे. म्हणून ही चिड आहे. या सर्व मंचाला. असेही  त्या म्हणाल्या. तुम्हाला माहिती आहे केंद्रात सत्ता त्यांचीच. राज्यात सत्ता त्यांची. आत्ता जिल्हा परिषद मधील सत्ता गेली
 तर भूमिपुत्रांच्या विषयी बोलणारी, नेतृत्व कमी करण्याची, खालसा करण्याचे त्यांचे नियोजन आहे. त्याला आपण बळी पडू. आणि ते बळी पडायचे नसेल तर आपला आवाज असा भूमिपुत्रांचा... ही नगरी आमची आहे... हा आवाज आमचा आहे... आणि न्याय व हक्क हे भूमिपुत्रांना मिळायलाच पाहिजे. हे जर करायचं असेल तर या वेळेला मशालीचाच विचार करावा लागेल... महाविकास आघाडीवर शंभर टक्के प्रेम करणारे आपले नातेवाईक, आप्त स्वकीय आहेत... त्यांच्यापर्यंत महाविकास आघाडीचे विचार पोहोचवा... विजय खेचून आणत असताना, बालदी खोपवून पालथी केली... अशा पद्धतीने पलटी केली... की ती परत उभी राहू शकणार नाही... आणि परत जर तिने उभी राहण्याचा प्रयत्न केला... तर मात्र आगरी कोळ्यांची आमच्या भूमिपुत्रांची जात काय आहे... हे  दाखवून देऊ... धोबीपछाड केल्याशिवाय राहणार नाही... ही  निवडणूक २०२९ ची नांदी आहे... सात तारखेला निवडणूक होईल... नऊ ‌ तारखेला मतमोजणी आहे... नऊ तारखेचा गुलाल हा फक्त आणि फक्त महाविकास आघाडीचाच राहील... याची मला खात्री आहे...

आपल्या भाषणात शेवटी ज्योतीताई ठाकरे यांनी उरण तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीला उभे असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले... नवघर जिल्हा परिषद सदस्य पदासाठी उभे असलेल्या प्रेरणा कुणाल पाटील, भेंडखळ पंचायत समिती गणाचे उमेदवार दीपक सुरेश भोईर, नवघर पंचायत समिती गणाचे उमेदवार परेश धनाजी ठाकूर हे महाविकास आघाडीचे उमेदवार असून या उमेदवारांना बहुमताने निवडून द्या असेही आवाहन ज्योतीताई ठाकरे यांनी केले... या जाहीर सभेला महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श्री शरदचंद्र पवार गट ),शिवसेना(श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ),शेतकरी कामगार पक्ष, महाराष्ट्र निर्माण सेना या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post