महाराष्ट्र वेदभुमी

भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता

रामटेक बसस्थानक ते शितलवाडी चौक दरम्यान दुभाजकाची मागणी

दुर्घटना रोखण्यासाठी नागरिकांची मागणी

प्रतिनिधी : सचिन चौरसिया

रामटेक :-रस्त्यावर दुभाजक निर्मिती, सर्विस रोड अनधिकृत पार्किंग, अतिक्रमण, बेशिस्त वाहतूक थांबे यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी, अतिक्रमण विभाग आणि वाहतूक पोलीस यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानीक नागरिक करीत आहेत. मनसर -रामटेक -सालाई खुर्द-तुमसर-तिरोडा या राष्ट्रीय राज्य महामार्ग क्र. ७५३ चे सुमारे ८७ किलोमीटर लांबीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या महामार्गाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ५ फेब्रुवारी २०१९ रोजी झाले होते. मात्र, सहा वर्षांचा कालावधी लोटूनही अनेक ठिकाणचे सर्व्हिस रोड अद्याप अपूर्ण असुन दुभाजक निर्मितीचे काम न केल्याने वाहनचालक व नागरिकांना रहदारीसाठी मोठी अडचण जात आहे. रामटेक शहरात अंबाला टर्निंग, अंबाला नर्सरी, नागार्जुन परिसर, रामटेक बस स्थानक, मनसर गांव, वाहिटोला रेल्वे क्रासिंग आदी. ठिकाणी सर्व्हिस रोडचे व दुभाजकाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. परिणामी मुख्य महामार्गावरच वाहने थांबत असल्याने वाहतूक कोंडी व  स्थानीकाना मुख्य रस्त्यावरुन जावे लागत असल्याने अपघातांचे प्रमाण दिवसेंगणिक वाढत चालले आहे. तिरोडा, तुमसर, मनसर, सावनेर तसेच जबलपूर व नागपूरकडून येणारी हजारो वाहने दररोज रामटेक बस स्थानक चौकातून ये-जा करतात. मात्र, बस स्थानक चौक ते शितलवाडी चौक दरम्यान रस्त्यावर दुभाजक (डिव्हायडर) नसल्यामुळे समोरासमोरून वाहने येत असून दररोज लहान-मोठ्या दुर्घटना घडत आहेत. भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर ॲड. प्रफुल अंबादे यांच्यासह अनेक नागरिकांनी बस स्थानक चौक ते शितलवाडी चौक दरम्यान तातडीने दुभाजक उभारण्यात यावा, तसेच महामार्गावरील अपूर्ण सर्व्हिस रोडचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे, अशी जोरदार मागणी प्रशासनाकडे केली आहे.

चौकात वाहतुक पोलिसाची गरज

शहरातील बसस्थानक चौक व गांधी चौक हे अतिशय वर्दळीचे व रहदारीचे चौक मानल्या जाते. येथे नेहमीच वाहतुकीचा खोळंबा निर्माण होत असतो मात्र ही विस्कळलेली वाहतुक सुरळीत करण्यासाठी येथे वाहतुक पोलिस कर्मचारी शोधुनही दिसत नाही. तेव्हा रामटेक पोलिस ठाण्यात नियुक्त वाहतुक पोलिस कर्मचारी कुठे ड्युटी बजावत असतात हा प्रश्न भल्याभल्यांना पडलेला आहे...

Post a Comment

Previous Post Next Post