दि. 10जानेवारी 2026
मुलुंड कॉलनीत ओव्हरलोड डंपरांचा धुमाकूळ सुरूच!
प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका तरुणाचा बळी
मुंबई प्रतिनिधी: (सतिश पाटील): मुलुंड कॉलनीतून ओव्हरलोड डंपरांची बेफाम वाहतूक सुरू असून नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. भांडुप कॉम्प्लेक्स व हाईलँड पार्क परिसरातील सुरू असलेल्या कामामुळे, लिंक रोड बंद असल्याने सर्व जड व ओव्हरलोड डंपर गुरु गोविंदसिंग मार्ग (G.G.S. मार्ग) मार्गे LBS मार्गाकडे वळवले जात आहेत.. हा मार्ग अरुंद, उतार-चढावाचा आणि पूर्णपणे रिहायशी असून शाळा, बाजारपेठा व दाट लोकवस्ती असलेला आहे...
महत्त्वाची बाब
सामाजिक कार्यकर्ते गोल्डी शर्मा यांनी तब्बल एक महिना आधीच T-वॉर्ड कार्यालयात वारंवार लेखी व तोंडी तक्रारी करून इशारा दिला होता की, ओव्हरलोड डंपरांमुळे अपघात होत असून भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते...
ही बाब T-वॉर्डचे सहाय्यक आयुक्त (P.G.) यांनाही कळवण्यात आली होती... मात्र, अनेक वेळा तक्रार करूनही आजतागायत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही...
यापूर्वीही गंभीर घटना घडल्या होत्या —
▪️ जयहिंद/जय शास्त्री नगर, मुलुंड पश्चिम, G.G.S. मार्गावर सुमारे एक महिना आधी डंपरने मोटरसायकलचा अपघात केला...
▪️ काही दिवसांपूर्वी अमर नगर जंक्शन, मुलुंड पश्चिम येथे डंपर पलटी झाला...
इतक्या घटना होऊनही, वेळोवेळी T-वॉर्डमध्ये तक्रारी देऊनही प्रशासनाने दुर्लक्षच केले...
आजचा दुर्दैवी प्रसंग
दिनांक : 10/01/2026 | वेळ : दुपारी साधारण 1 वाजता स्थळ : मुलुंड कॉलनी, भाजी मार्केटजवळ, G.G.S. मार्ग, मुलुंड पश्चिम एका ओव्हरलोड डंपरखाली येऊन अवघ्या 34 वर्षांच्या तरुणाचा जागीच चिरडून मृत्यू झाला... हा मृत्यू अपघात नसून, प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा आणि निष्काळजीपणाचा थेट परिणाम आहे...
जबाबदार कोण?
▪️वारंवार तक्रारी असूनही कारवाई न करणारे T-वॉर्ड अधिकारी
▪️ओव्हरलोड डंपर चालवणारे ठेकेदार
▪️वाहतूक नियंत्रणात अपयशी ठरलेले संबंधित यंत्रणा
आता तात्काळ कारवाई हवी :
ओव्हरलोड डंपरांवर कठोर दंडात्मक कारवाई..
रिहायशी भागातून डंपर वाहतूक त्वरित बंद करावी..
डंपरांसाठी सुरक्षित व पर्यायी मार्ग तात्काळ निश्चित करावा..
संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर FIR दाखल करावी..
प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप तरुणाला आपला जीव गमवावा लागला..
आता तरी जबाबदारी निश्चित होणार का?...
की पुन्हा एखाद्या जीवाची किंमत मोजावी लागणार आहे?..
