पत्रकार मयुर पालवणकर मुरुड
रायगडः मापगाव येथे सशस्त्र गुन्हेगारांनी भयंकर हल्ला केला... ४ जानेवारी २०२६ रोजी पहाटे अलिबाग तालुक्यातील मापगाव येथील कुकुचीकु पोल्ट्री फार्मचे मालक कुणाल दिलीप पाथरे यांच्या घरात ८-९ सशस्त्र गुन्हेगारांनी हल्ला केला..... खिडकी तोडून आणि ग्रिलचा लॉक फोडून घरात शिरलेल्या आरोपींनी चाकू, सुरे आणि लोखंडी रॉडचा धाक दाखवत कुटुंबाला बंधक बनवले... या दरोड्यात सोन्याचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण १८,२२,००० रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला...
