सोगाव - अब्दुल सोगावकर : अलिबाग तालुक्यातील सोगाव विभागातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्येत आता मोबाईल नेटवर्कच्या समस्येने अधिकच भर घातली आहे. येथील ग्रामीण भागात सतत मोबाईल नेटवर्क जाम होत असल्याने फोन केला असता फोन भलतीकडेच लागतो तर अनेक वेळा रिंगच वाजत नाही, तसेच रेंजमध्ये खाली वर बदल होऊन फोन लागत नाही आणि लागला तर आवाज स्पष्ट ऐकू येत नाही, अशा प्रकारच्या अनेक समस्यांनी या परिसरातील ग्रामस्थ अक्षरशः बेजार झाले आहेत. सर्वात विशेष म्हणजे या भागात अनेक कंपन्यांचे टॉवर असूनही ते काम करत नसल्याचे दिसून येत नसल्याने सोगाव येथील मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच वसीम कुर यांनी संबंधित कंपन्यांविरोधात संताप व्यक्त केला आहे...
इंटरनेट व नेटवर्क यावर सध्या आजचे जग धावत आहे, प्रत्येक संगणकिय कामात इंटरनेट आवश्यक आहे, मात्र अलिबाग तालुक्यातील सोगाव पंचक्रोशीत नेटवर्क समस्या एकंदर गंभीर बनली आहे. प्रगत व अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत नवनवीन शोध लागले असले तरी अनेक ठिकाणी प्रत्यक्षात मोबाईल आहे, पण इंटरनेट व रेंजच नसल्याने मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाली आहे. मात्र प्रत्यक्षात इंटरनेट व नेटवर्कचा सर्वत्र बोजवारा उडाल्याची परिस्थिती आजच्या घडीला दिसून येत आहे. जिओ, एअरटेल, व्ही.आय. व इतर कंपन्यांच्या सिमला नेटवर्क (रेंज) नसल्याने नागरीकांना महत्वाच्या कामासाठी व अडीअडचणीच्या प्रसंगी तातडीने संपर्क करताना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आजच्या घडीला अन्न, पाणी, वस्त्र, निवारा याप्रमाणे मोबाईल व त्या मोबाईलची नेटवर्क (रेंज) इंटरनेट हे महत्वाची व जिवनावश्यक बाब बनली आहे, त्यामुळे मोबाईल असेल तर रेंज व इंटरनेट सुरळीत असणे अत्यंत महत्वाचे आहे... इंटरनेट व नेटवर्क यावर आजचे जग धावत आहे, प्रत्येक संगणकिय कामात इंटरनेट आवश्यक आहे, मात्र सोगाव विभागात नेटवर्क समस्या अधिकच गंभीर बनली असल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत...
मोबाईल नेटवर्क समस्येमुळे ब्रॉडबॅन्ड, वायफाय, मोबाईल व इंटरनेट, सुरक्षेच्या दृष्टीने बसवलेली सि. सी. टिव्ही, गुगल पे, फोन पे, पेटीएम व अन्य ऍपद्वारे ऑनलाईन पेमेंट करताना अडचणी येऊन मोठ्या गैरसोयी होत असून इतर अनेक सेवा देखील बंद पडत आहे... तसेच इंटरनेटवर अवलंबून असलेली शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कामे पुर्णपणे रखडली जात आहेत. ऑनलाईन मीटिंग व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी इंटरनेट व नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे... लोकवस्तीच्या भागात सुरळीत चालणारे मोबाईल नेटवर्क मागील अनेक महिन्याभरापासून सतत जाम होत असल्याने हजारो मोबाईल ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे... सबंधीत कंपन्यांनी मोबाईल नेटवर्क व इंटरनेट समस्या दूर करण्यासाठी आवश्यक व ठोस उपाययोजना करावी, मात्र या समस्येकडे सबंधीत कंपन्या दुर्लक्ष करीत असल्याने मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच वसीम कुर यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी सेवा देणाऱ्या कंपन्यांविरोधात आमच्या प्रतिनिधीकडे संताप व्यक्त केला आहे...
