महाराष्ट्र वेदभुमी

मुशेत येथे नामफलकाचे अनावरण संपन्न

 

सोगाव - अब्दुल सोगावकर : अलिबाग तालुक्यातील मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील मुशेत येथे रविवार दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी 'स्वच्छ सुंदर माझे गाव मुशेत' या नामफलकाचे अनावरण मुशेत येथील ग्रामस्थ किशोर हडकर, जि. प. गट आवास शिवसेना(शिंदे गट) उपविभाग प्रमुख धवल राऊत यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवर आणि मुशेत पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात अनावरण करण्यात आले... 

       यावेळी जि.प.गट आवास शिवसेना(शिंदे गट) विभाग प्रमुख जगदीश सावंत यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या आमदार निधीतून व ग्रामपंचायतीच्या विकास निधीच्या माध्यमातून मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील मुनवली, सोगाव, चोरोंडे, मुशेत, मापगाव, बहिरोळे, बेलवली या सातही गावांमध्ये रस्ते, वीज, पाणी आदी अनेक विकासात्मक व मूलभूत गरजेच्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. यामध्ये जगदीश सावंत यांनी काही विकासकामे पूर्ण केली आहेत तर काही विकासकामे प्रगतीपथावर आहेत. या पुढील काळात अनेक विकासकामे करण्याचा संकल्प केला असल्याचे जगदीश सावंत यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे...

        मुशेत येथील नामफलकाच्या अनावरण प्रसंगी जगदीश सावंत यांच्यासह जागृती सावंत, संघटक राजेंद्र घरत, मुशेत शाखा प्रमुख जितेंद्र करंजूकर, बहिरोळे शाखा प्रमुख प्रमोद दळवी, मुशेत पोलीस पाटील चंद्रशेखर सुर्वे, गट प्रमुख उत्तम राऊत, मुशेत ग्रामस्थ हरिश्चंद्र हडकर, प्रतीक सावंत, मंदार सावंत, समद आतार, विनायक करंजूकर, अमेय सुर्वे, गौरव लोहार, शशिकांत करळकर, मनोज सुर्वे, रोहित करळकर, पार्थ सुर्वे, अमित मसुरकर, मिहीर सावंत, गणेश राऊत, वैभव राऊत, सुनिता सावंत, मोहिनी सावंत, अश्विनी हडकर-करंदेकर, अशोक भाई करंदेकर, कमर सुलताना सैय्यद आदी मान्यवर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते...

फोटो लाईन :- मुशेत येथे नामफलकाचे उद्घाटन करताना उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ,

Post a Comment

Previous Post Next Post