महाराष्ट्र वेदभुमी

प्रोफेसर प्रशांत म्हात्रे सर यांना राज्यस्तरीय कुलाबा जीवन गौरव पुरस्कार

प्रतिनिधी पाले (सत्यवान म्हात्रे): जगाच्या  इतिहासात किती आले किती गेले याच्याशी महत्व नाही परंतु आपण समाजासाठी काय केलं खरंच महत्त्वाचं आहे कडापे सारख्या दुर्गम भागातून अतिशय कठोर परिस्थितीचा सामना करीत आपल् शिक्षण पूर्ण करत शिक्षक या पदापर्यंत पोहोचत शिक्षकी पेशाच्या माध्यमातून आदर्श विद्यार्थी घडवण्याचं काम करणारे सामाजिक क्षेत्रात नेहमीच वावर असणारे तसेच क्रीडा क्षेत्राचा एक चांगला असा अनुभव असणारे स्वातंत्र्यवीर सावरकर उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रोफेसर   आदर्श शिक्षक प्रशांत म्हात्रे सर यांना यावर्षीचा शिक्षण क्षेत्रातला राज्यस्तरीय अशा कुलाबा जीवन गौरव पुरस्कारअँड उमेश ठाकूर भाई जगताप काँग्रेस आमदार  प्रशांत नाईक माजी नगराध्यक्ष अलिबाग नगर परिषद विद्यमान नगरसेवक आणि प्रविण ठाकूर,सुनिल थळे आदी मान्यवर ह्याच्या हस्ते

  सन्मानित करण्यात आले आहे सदर पुरस्कार हा गेले अनेक वर्ष काँग्रेस सेवा फाउंडेशन रायगड अलिबाग मुरुड काँग्रेस कमिटी भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना ओबीसी व अल्पसंख्यांक कमिटी आणि युवक काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी एडवोकेट श्री उमेश मधुकर ठाकूर सरचिटणीस मधुशेठ ठाकूर चारिटेबल ट्रस्ट अध्यक्ष काँग्रेस सेवा फाउंडेशन रायगड अध्यक्ष भाई जगताप मित्र मंडळ यांच्या संयोजनतून उमेश दादा यांच्या वाढदिवसानिमित्त पुढील कार्यक्रमाचे आयोजन केले आहे आणि या वाढदिवसाच्या प्रसंगी सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले पुरस्काराचे स्वरूप होते प्रशस्तीपत्र पदक मायेचे उबदार शाल अस स्वरूप होते  आज प्रशांत म्हात्रे सर यांनी हा पुरस्कार ज्यांनी माझी जडणघडण केली त्या आई बाबा ना अर्पण केला आहे सदर पुरस्कार मिळालेल्या प्रशांत म्हात्रे  सर यांचे सर्व सर्व स्तरावरन सरांवर प्रेम करणारे सरांचे शुभचिंतक  अनेक नामवंत संस्था यांना कमालीचा आनंद झाला आहे त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येते... स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयातर्फे तसेच सारडे विकास मंच,  प्रीतम स्पोर्ट्स कडापे निगा फाउंडेशन आवरे सुयश क्लासेस आवरे व सर्व शुभचिंतक यांनी प्रोफेसर प्रशांत म्हात्रे सर यांचे अभिनंदन करण्यात आलेले आहे..

Post a Comment

Previous Post Next Post