रोहा तालुक्याचे भाजपचे अध्यक्ष अमित घाग यांना जिल्हापरिषद निवडणुकीत उमेदवारीची मांगणी...
प्रतिनिधी शहानवाज मुकादम/रोहा...
रोहा: भुवनेश्वर येथे भारतीय जनता पार्टी कडून जिल्हा परिषद गट भव्य निर्धार मेळावा राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले...
रोहा तालुक्याचे भारतीय जनता पार्टी चे अध्यक्ष अमित घाग यांना जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची मांगणी भाजपचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली...
या मेळाव्यात राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील यांनी आपल्या भाषणातून भारतीय जनता पार्टी च्या सर्व कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
राजाच्या पोटी राजा जन्माला यायचे, पण आता चायवाल्याच्या पोटी पंतप्रधान जन्माला आला आहे...
कष्टकरी शेतकरी यांना अनेक योजना मोदीजीने आनले आहेत आसे रोहा तालुक्यातील कार्यकर्त्यांना सांगत भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक गावागावातील कार्यकर्ता सरपंच, सदस्य आणि पंचायत समिती व जिल्हा परिषदेचा सदस्य झाला पाहिजेत...
"तुमचे मित्रपक्ष जेव्हा तुमच्याकडे चर्चा करायला येतील तेव्हा त्यांना सांगा आमचा सत्य मधला हिस्सा आम्हाला पाहिजेत, तेव्हा ते तुम्हाला सांगतील तुमची ताकद नाही आहे तुम्ही एक सीट घ्या आसे बोलतील...
ज्या प्रकारे रोहा नगर परिषद च्या निवडणुकीत रोशन चाफेकर यांना नगरसेवक पदाची उमेदवारी देतांना झाले ते आता झाले नाही पाहिजेत, भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणूक लढविण्यास तयार आहे आसा ही नाव न घेता राष्ट्रवादी पक्षाला टोळा खासदार धैर्यशील पाटील यांनी दिला...
या भारतीय जनता पार्टीच्या रोहा तालुका ४१ भुवनेश्वर जिल्हा परिषद गट भव्य निर्धार मेळाव्यात रोहा तालुक्यातील भाजप चे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह सर्व बुथ अध्यक्ष आणि महिलावर्ग ही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते...
