महाराष्ट्र वेदभुमी

हक्काच्या मार्गासाठी मुंबई गोवा महामार्गावर आंबेवाडी वरसगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे साखळी उपोषण.

रिपोर्टर श्याम लोखंडे रोहा रायगड : राष्ट्रीय महामार्ग ६६ मुंबई गोवा महामार्ग च्या अन्यायी मनमानी कारभारचे विरोधात आंबेवाडी नाका येथील उड्डाणपूलाच्या सुरू असलेल्या कामाबाबत तसेच ठेकेदाराच्या मनमानी कारभारावर नाराजी व्यक्त करत सोमवारी ५ जानेवारी रोजी साखळी उपोषण करण्यात आले आहे...

तर सदरच्या मागण्यात आंबेवाडी वरसगांव कोलाड येथिल VUP उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला २०० मिटर अंतरावर अंडरपास बोगदे देण्यात यावे,..

सर्विस रोडचे काम आजपर्यंत पुर्ण झाले नाही ते काम पूर्ण करून देणे, गटारावरील झाकणे बसवून देणे, तसेच येथील नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणून सदर अंडर पास पेण. नागोठना. लोणेरे. महाड. येथे ठेवण्यात आले आहेत मग आंबेवाडी कोलाड वरसगाव या ठिकाणी न ठेवल्याने आमच्यावरच अन्याय निर्माण होत आहे तर कोलाड नाक्यावरील मोठी बाजारपेठ असल्याने असंखे नागरिक तसेच प्रवासी येथून रात्रंदिवस प्रवास करत असतात... तर उड्डाण पुलाच्या कामात दोन अंडर बाय पास मार्ग ही गरज असल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा लाक्षणिक उपोषण आंबेवाडी कोलाड वरसगाव पंचक्रोशीतील सर्व जागरूक नागरिक या ठिकाणी केला...

Post a Comment

Previous Post Next Post