प्रतिनिधी आवरे (मुकेश गावंड) : आयुष्य हे खूप छोटं आहे.. आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद हा सर्वानी घ्यायला हवा.. कारण जगात एक अंतिम सत्य आहे खरा आनंद हा दुसऱ्याना देण्यात असतो.. जर आनंद दिला तर तो लाखो पटीने वाढत असतो.. सद्या सर्वत्र क्रीडा स्पर्धेचा हंगाम आहे...
क्रीडा स्पर्धा आणि विद्यार्थी हे समीकरण आपण नेहमीच पाहत असतो.. परंतु प्रत्यक्षात वार्षिक क्रीडा महोत्सवासाठी विद्यार्थ्यांच्या पालक वर्ग यांनी दिलेला प्रतिसाद हा आगळा वेगळा असेल तर विरळच..!
जानकीबाई जनार्दन ठाकूर इंग्लिश मेडिअम शाळेत यावर्षीच्या क्रीडामहोत्सवात विद्यार्थ्यांचे पालक शालेय क्रीडा महोत्सवात विविध क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी होऊन एक विद्यार्थ्यांसमोर तसेच सामाजिक स्तरावर आदर्श ठेवला, आणि याद्वारे एक प्रकारचा सर्व विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत केला... आपण क्रीडा स्पर्धेमध्ये नेहमीच विद्यार्थी सहभागी होताना पाहत असतो, परंतु जानकीबाई जनार्दन ठाकूर विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा उत्सवामध्ये मोठ्या आनंदाने सहभाग घेतला.. यामध्ये खेळाच्या विविध प्रकारचे खेळ म्हणजे संगीत खुर्ची बादलीत चेंडू तसेच रनिंग रेस व इतर मनोरंजन खेळ अशा विविध खेळांचा आनंद पालकांनी लुटला.. वार्षिक क्रीडा महोत्सव दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या शारीरिक कसरतींना वाव देण्यासाठी विद्यालयात घेतला जातो... अशा प्रकारचा उपक्रमात पालक सहभागी झाल्याबद्दल सर्व पालकांचे अभिनंदन आत्माराम ठाकूर मिशन व संस्थेचे व जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कुलचे सचिव श्री वामन ठाकूर संस्थेचे अध्यक्ष प्रतीक ठाकूर सौ अलका ठाकूर , सिंधू ठाकूर प्रसाद ठाकूर रिना ठाकूर तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ निकिता म्हात्रे शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले..
