प्रतिनिधी सचिन चौरसिया
रामटेक :- संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती सोमवारी शहरात मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात साजरी करण्यात आली... संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०१ व्या जयंतीनिमित्त लंबे हनुमान मंदिर येथे गीताचार्य मोरेश्वर माकडे यांचे संत जगनाडे महाराज यांचे जीवनावर प्रवचन व भजन झाले... तेली समाज धर्मशाळा येथे दुपारी आदरांजली वाहण्यात आली... महाप्रसाद तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते... संताजी जगनाडे महाराज यांनी समाजजागृती, भक्ती आणि समतेचे अग्रदूत म्हणून कार्य केले... साधी जीवनशैली, अखंड नामस्मरण आणि समतेचा संदेश देणारे संताजी महाराज विदर्भातील तेली समाजात जन्मले... कीर्तन, प्रवचन आणि सामाजिक उपक्रमांतून त्यांनी अंधश्रद्धा, जातिभेद यांना विरोध करून समाजिक एकतेचा मार्ग दाखविला... मानवतेचा आणि शांततेचा संदेश दिला... संताजी महाराजांचे विचार आजही समाजाला प्रेरणा देत आहेत, असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले...
कार्यक्रमाला नानाभाऊ उराडे, भाऊराव राहाटे, आनंदराव चोपकर, विश्वनाथ कापसे, गणपत भूरे, सचिन किरपान, रमेश कारामोरे, बिकेंद्र महाजन, अजय खेडगरकर, मोहन कोठेकर, कार्तीक उराडे, खुशाल चकोले, रमाकांत कुंभलकर, कांचनमाला माकडे, बबिता कोठेकर, रेखाताई खोडे, निशा कुंभलकर, बालचंद खोडे आणि मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते...
