महाराष्ट्र वेदभुमी

जानकीबाई जनार्दन ठाकूर विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार

 


प्रतिनिधी आवरे(सचिन पाटील): भारत हा संस्कृती प्रधान देश आहे ही जगाच्या पाठीवर आपल्या देशाची संस्कृती ही महान आहे संस्कृती परंपरा व सांस्कृतिक प्रतिके ही राष्ट्राची जणू काही मान सन्मान असतात ह्या परंपरा जतन करण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी भारतातील प्रत्येक घटक हा प्रयत्नशील आहे मग ती हस्तकला ,असो शिल्पकला,किंवा नृत्यकला असो किंवा विविध कला असो नृत्यकला हे एक मनोरंजनाचे माध्यम आहे शालेय स्तरावर ह्या कलेचा सहशालेय उपक्रमात आपली कला सादर  करून या नृत्यकलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला व्यासपीठ मिलते  व शालेय स्तरावर सर्व घटकांचे मनोरंजन होते  हा एकमेव उद्देश आहे विद्यार्थी अभ्यासात  प्रगतीशील असतात विज्ञानात अग्रेसर असतात क्रीडा या प्रकारात विशेष प्राविण्य प्राप्त करत असतात तसेच शालेय स्नेहसंमेलनाद्वारे आपल्यातील विविध गुण  अविष्कार दाखवत असतात हे सर्व सांगण्याचे कारण एकच आवरे गावातील इंग्रजी माध्यमाची शाळा जानकीबाई जनार्दन ठाकूर या इंग्रजी माध्यमाच्या  शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा व स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडला  या कार्यक्रमात  जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे मधील विद्यार्थ्यांनी अतिशय दमदार अशी नृत्य ,कोळीगीत आगरी , गीत हिंदी लोकगीते पंजाबी  व आताची सृजनशील नवं गीते अशा मिश्र संगीताच्या तालावर विद्यार्थ्यांचे पाय  थिरकले व सर्व प्रेक्षकांना एक संगीताची व नृत्याची पर्वणी मिळाली  सुरुवातीला संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष स्वर्गीय अशोक जनार्दन ठाकूर सर यांच्या स्मृतीस विनम्रपणे अभिवादन करत उपस्थित सर्व मान्यवर विद्यार्थी पालक तसेच कार्यक्रमातील प्रेक्षक यांनी अशोक ठाकूर सर यांना उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली  कार्यक्रमाचे  प्रमुख उद्घाटक व कार्यक्रमाचे अध्यक्ष उरणचे माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले श्री मनोहरशेठ भोईर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना  असे नमूद केले या संस्थेचे अध्यक्ष संस्थापक स्वर्गीय अशोक ठाकूर सर जर आज हयात  असते तर त्यांना हा कार्यक्रम पाहून  निराळाच आनंद झाला असता दुर्दैवाने विद्येचे उपासक शिक्षण प्रेमी अशोक ठाकूर सर यांचे या वर्षी  निधन झाले त्यांच्या पवित्र आत्म्यास मी सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे जानकीबाई जनार्दन ठाकूर इंग्रजी माध्यम ही शाळा आवरे गावातील नव्हे   तर या पंचक्रोशीतील गुणवत्तापूर्वक शाळा म्हणून या शाळेकडे पाहिले जाते या शाळेतील विद्यार्थ्यांचा निकाल व शिक्षकांचा   विद्यार्थ्यांना शिकविण्याचा दर्जाअतिशय चांगल्या पद्धतीची आहे असे आपल्या मनोगत व्यक्त केले स्नेहसंमेलना सोबत वार्षिक पारितोषिक पारितोषिक वितरण कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला यात सर्वच क्षेत्रात विशेष प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थी  तसेच शिक्षक यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक , सन्मानचिन्ह पदक व देऊन गौरव करण्यात आला   कार्यक्रमासाठी उरण चे माजी आमदार  श्री मनोहर भोईर साहेब उरण पंचायत समितीच्या शिक्षण अधिकारी मॅडम सौ  निर्मला घरत  पनवेल चे माजी नगरसेवक श्री  श्रीकांत ठाकूर  आवरे गावच्या सरपंच  निराबाई पाटील मनोदय इंग्लिश मेडियम स्कुल चे अध्यक्ष श्री धिरेंद्र ठाकूर सर   मधुकर ठाकूर प्रतिष्ठान चे श्री कौशिक ठाकूर  सर उत्तम   सूत्रसंचालक  श्री महेश गावंड सर गोवठणे विकास मंच चे अध्यक्ष श्री   सुनील वर्तक सर   आवरे ग्रुप  ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील  सर समाजसेवक श्री प्रमोद म्हात्रे सुयश क्लासेस आवरेचे श्री  निवास गावंड सर विद्यालयाच्या मुख्यद्यापिका सौ  निकिता म्हात्रे मॅडम  आत्माराम ठाकूर मिशन एवम जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल संस्थेचे अध्यक्ष प्रतिक ठाकूर सर , श्री वामन ठाकूर सदस्य सौ  अलका ठाकूर  सदस्य सिंधू ठाकूर  आदिनाथ ठाकूर सुनील ठाकूर हे मान्यवर उपस्थित होते हे स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन  शिल्पा म्हात्रे मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन सौ निकिता म्हात्रे मॅडम यांनी केले आशा प्रकारे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिले  तसेच पालक वर्ग तसेच   ग्रामस्थांनी यांनी  चांगला प्रतिसाद दिला अश्या प्रकारे जानकीबाई जनार्दन ठाकूर विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार

Post a Comment

Previous Post Next Post